मोठी दुर्घटना! पोलिसांची कार नदीत पडली, 7 जणांचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी

मोठी दुर्घटना! पोलिसांची कार नदीत पडली, 7 जणांचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी

Himachal Pradesh Accident : हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात एक अपघाताची मोठी दुर्घटना घडली. शुक्रवारी झालेल्या अपघातात पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात 6 पोलिस कर्मचाऱ्यासंह अन्य एकाचा मृत्यू झाला. तर या अपघात अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तीसा बैरागढ मार्गावरील तराई पुलाजवळ हा झाल्याची माहिती आहे. (In Himachal Pradesh police van cae accident 7 died)

मिळालेल्या माहितीनुसार, चंबा जिल्ह्यात ही अपघाताची दुर्दैवी घटना घडली. हे जवान लाँग रेंज पेट्रोलिंगवरून भंजराडू मुख्यालयाकडे परतत होते. यादरम्यान तराई पुलाजवळ हा अपघात झाला. सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. तुराई पुलाजवळ डोंगरावरून खाली आलेला एक दगड थेट जीप चालकाच्या डोक्यावर पडली. त्यामुळं चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीप थेट नदीत पडली. त्यात गंभीर दुखापत झाल्यानं 7 जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी अपघातस्थळी धाव घेलती आणि या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. या जीपमधून 9 पोलिस कर्मचाऱ्यासंह 11 जण प्रवास करत होते.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर! भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये विविध पदांची भरती सुरू, वाचा कोणाला करता येणार अर्ज? 

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी ट्विट करून अपघातातील मृतांविषयी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, चंबा जिल्ह्यातील तीसा-बैरगड मार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात पोलिस कर्मचाऱ्यांसह एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला तर अन्य काही जण जखमी झाल्याची दुःखद वार्ता मिळाली. या मृतांच्या कुटूंबियांप्रती संवेदना आणि जखमी नागरिक लवकरात लवकर बरे होवो ही प्रार्थना. जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनीही या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, पोलीस दलाच्या वाहनाला अपघात झाल्यानं 6 पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी मिळाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांत दिवो. तर जखमी झालेले इतर पोलिस लवकरात लवकर बरे व्हावेत ही ईश्वर चरणी प्रार्थना, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube