सह्याद्री रुग्णालय तोडफोड प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल; चौघे ताब्यात

Sahyadri Hospital vandalism प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sahyadri Multi Specialty Hospital

Case registered against seven people in Sahyadri Hospital vandalism case; four arrested : पुण्यामध्ये शिवसेनेच्या वैद्यकीय कक्ष शहर प्रमुख अजय सपकाळ यांच्या वडिलांचं सह्याद्री रुग्णालयात निधन झाल्यानंतर मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं.या निधनानंतर हडपसर येथील सह्याद्री मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी आता सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश; बिबट्यांच्या हल्ल्यांसाठी स्वतंत्र व पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकारी नेमणार

पोलिसांनी तत्काळ दाखल घेत, तोडफोड करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. तर सात जणांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात शुभम सकपाळ, गौरव सकपाळ, विश्वजीत कुमावत, कुणाल सकपाळ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video : कधीकधी गोष्टी आपल्या मनाप्रमाणे.., लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पहिल्यांदाच सोडलं मौन

अजय सपकाळ हे एकनाथ शिंदे,यांच्या शिवसेनेचे वैद्यकीय कक्षाचे शहर प्रमुख आहेत. मी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्याने त्याची खुन्नस काढत माझ्या वडिलांना या लोकांनी शिक्षा दिल्याचा आरोप अजय सपकाळ यांनी केला आहे. अजय सपकाळ यांच्या वडिलांचे 28 तारखेला साडेबारा वाजता अल्सरच ऑपरेशन होतं.

Goa Night Club Fire Tragedy : गोवा नाईटक्लब आग प्रकरण, थायलंडमध्ये लुथरा बंधूंना अटक

मी डॉक्टरांकडे माहिती घेऊन माझ्या वडिलांना रुग्णालयात ऍडमिट केलं होतं दोन दिवसात व्यवस्थित होतील असं त्यांनी मला सांगितलं. 28 तारखेला ऑपरेशन झालं त्यानंतर दोन दिवसात माझे वडील व्यवस्थित झाले. दोन दिवसात ते शुद्धीवर आले होते. त्यांचे व्हेंटिलेटर काढलेलं होतं त्यांनी आमच्या सोबत गप्पा मारल्या. दोन दिवस ऑपरेशन झालेल्या माणसाला तेथील डॉक्टरांनी खुर्चीवर बसवलं आणि 20 ते 25 टाक्यांपैकी त्यांचे सहा-सात टाके त्यावेळेस तुटले. याबाबत डॉक्टरांनी आम्हाला कुठलीही कल्पना दिली नाही. त्यांच्या शरीरात इन्फेक्शन झाल असल्याचं सांगितलं आणि स्कॅन करायला घेऊन गेले.

हेमंत ढोमे यांच्या शाळेत पार पडला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चा संगीत अनावरण सोहळा

अल्सरच ऑपरेशन झालेल्या रुग्णाच्या फुफुसात पाणी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं नाही. फक्त इन्फेक्शन आहे इतकच सांगत राहिले. डॉक्टरांनी चुकीची ट्रीटमेंट देऊन माझ्या वडिलांना मारल्याचा आरोप अजय सपकाळ यांनी केला आहे.शिंदे साहेब मी तुम्हाला सांगत आहे मी शिवसेनेचा शहर प्रमुख असतानाही तुमच्या कार्यकर्त्याला हा न्याय मिळत असेल तर सर्वसामान्यांचे काय हाल असतील.

शासनाची मंजूरी मिळत नसल्याने एसटी मधील 5000 चालक, वाहक वर्षानुवर्षे हंगामी वेतन श्रेणीवर

तोडफोड कोणी केली याची आम्हाला कल्पना नाही पण सर्वसामान्य माणसाला रोज या रुग्णालयाच मारण्याचे काम आहे. हे लोक इन्शुरन्सचे पैसे उकळतात आणि माणसं मारतात. जोपर्यंत हे रुग्णालय सील होत नाही आणि आम्हाला न्याय मिळत नाही. तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत.मी वैद्यकीय क्षेत्रात काम करतो याची खुन्नस काढून त्याची शिक्षा माझ्या वडिलांना या लोकांनी दिली आहे.असा आरोप सपकाळ यांनी केला आहे.

 

follow us