इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये मोठी दुर्घटना! 7 मजली इमारतीला आग जवळपास 20 लोकांचा मृत्यू
Major accident in Jakarta, Indonesia मध्ये 7 मजली इमारतीला आग आगल्याने जवळपास 20 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Major accident in Jakarta, Indonesia! Fire in 7-storey building kills nearly 20 people : हॉंगकॉंगची घटना ताजी असतानाच इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये 7 मजली इमारतीला आग आगल्याने जवळपास 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आगीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, जकार्तामध्ये 7 मजली इमारतीला आग लागली. यामध्ये ऑफिसेस होते.
नर्तिकेच्या नादातून युवकाचं टोकाच पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन
तर पोलिसांचे प्रमुख सुसात्यो पुनोर्मो कोंड्रो यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग मंगळवारी दुपारच्या सुमारास लागली होती. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या या आगीने रौद्र रूप धारण केलं आणि पूर्ण इमारत आगीच्या विळख्यात अडकून खाक झाली. यामध्ये टेरा ड्रोन इंडोनेशियाचे अनेक कर्मचारी होते. आग लागली तेव्हा ते जेवणाच्या सुट्टीसाठी बाहेर पडले होते. पहिल्या मजल्यावर ठेवलेल्या बॅटरिजमुळे ही आग लागली. त्यानंतर आता या आगीतून वाचलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.
मोठी बातमी! उद्योगपती अंबांनीचा मुलगा सीबीआयच्या जाळ्यात, बँकेची काय आहे तक्रार?
मात्र आता आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं असून जवळपास 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आगीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. फायरफायटर्स बॉडी बॅग घेऊन जाताना दिसून येत आहेत. यामध्ये टेरा ड्रोन इंडोनेशियाचे अनेक कर्मचारी होते. ही कंपनी मायनिंगपासून शेतीपर्यंत सर्व क्षेत्रासाठी ड्रोन पुरवण्याचं काम करते. मात्र घटनेवर अद्याप या कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
हॉंगकॉंगमध्ये राहिवासी इमारतीला भीषण आग
दरम्यान या अगोदर 26 नोव्हेंबर रोजी हॉंगकॉंगमधील तैपे या ठिकाणी एकाच वेळी तब्बल सात इमारतींना आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ज्यामध्ये तब्बल 44 लोकांचा मृत्यू झाला होता. याबाबत पोलिसांनी तीन संशयतांना अटक केली होती. बुधवारी 26 नोव्हेंबरच्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही आग लागण्याची घटना घडली. त्यानंतर साडेतीन वाजेपर्यंत तब्बल चार अलार्म फायर वाजले. जे हॉंगकॉंग मधील दुसरे मोठे अलार्म सांगितले जात आहेत. जे अत्यंत मोठी दुर्घटना झाल्यानंतर वाजतात.
