मोठी बातमी! उद्योगपती अंबांनीचा मुलगा सीबीआयच्या जाळ्यात, बँकेची काय आहे तक्रार?

सीबीआय आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे, ज्यामध्ये निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांची चौकशी केली जाईल असं या तक्रारीत म्हटलं.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 09T154836.750

केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र जय अनमोल अंबानी यांच्याविरुद्ध कथित फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा खटला युनियन बँक ऑफ इंडियाच्या २२८.०६ कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीशी संबंधित आहे. बँकेनं दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

अनमोल अंबानी यांनी त्यांच्या एका समूह कंपनीमार्फत बँकेकडून कर्ज घेतलं होतं आणि नंतर कर्ज फेडण्यात अयशस्वी झाले, ज्यामुळे बँकेचं मोठं आर्थिक नुकसान झालं. सीबीआय आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे, ज्यामध्ये निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांची चौकशी केली जाईल असं या तक्रारीत म्हटलं आहे. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, जय अनमोल अनिल अंबानी आणि रवींद्र शरद सुधाकर, RHFL चे दोन्ही संचालक यांच्याविरुद्ध बँकेने (पूर्वीची आंध्र बँक) केलेल्या तक्रारीवरून सीबीआयनं कारवाई केली आहे.

महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशन एकवटली; विविध तातडीच्या प्रश्नांवर नागपूरमध्ये मोर्चा काढणार

आरएचएफएलनं आपल्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी मुंबईतील बँकेच्या एससीएफ शाखेकडून ४५० कोटी रुपयांची कर्जाची मर्यादा मिळवली होती. कर्जाची सुविधा देताना, बँकेने आरएचएफएलवर अनेक अटी लादल्या, ज्यात आर्थिक शिस्त राखणं, हप्ते, व्याज आणि इतर शुल्क वेळेवर भरणं आणि सर्व विक्री उत्पन्न बँक खात्यातून वळवणं समाविष्ट होतं असं बँकेने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच, कंपनी वेळेवर हप्ते भरण्यात अपयशी ठरल्यानं ३० सप्टेंबर २०१९ रोजी खात्याला एनपीए (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट) घोषित करण्यात आलं. बँकेच्या तक्रारीच्या आधारे, १ एप्रिल २०१६ ते ३० जून २०१९ या कालावधीसाठी ग्रँट थॉर्नटन यांनी फॉरेन्सिक ऑडिट केलं.

झालेल्या चौकशीत असं दिसून आलं की कर्ज घेतलेल्या निधीचा गैरवापर करण्यात आला. निधी वळवण्यात आला आणि मूळ व्यवसाय उद्देशाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी खर्च करण्यात आला आहे. त्याचबरोबर बँकेनं आरोप केलाय की, कंपनीचे माजी प्रवर्तक/संचालक असलेल्या आरोपींनी खात्यांमध्ये फेरफार केला आणि फसवणूक करून निधीचा गैरवापर केला. त्यांनी बँकेच्या आर्थिक बाबींचा गैरवापर केला आणि निधी इतर कारणांसाठी वळवला, ज्यामुळं बँकेचं ₹२२८ कोटींचं नुकसान झालं. सीबीआयने आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू केली आहे.

follow us