Goa Night Club Fire Tragedy : गोवा नाईटक्लब आग प्रकरण, थायलंडमध्ये लुथरा बंधूंना अटक

Goa Night Club Fire Tragedy : गोवा नाईटक्लब आग प्रकरणात मुख्य आरोपी लुथरा बंधूंना थायलंडमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील

  • Written By: Published:
Goa Night Club Fire Tragedy

Goa Night Club Fire Tragedy : गोवा नाईटक्लब आग प्रकरणात मुख्य आरोपी लुथरा बंधूंना थायलंडमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपी गौरव लुथरा आणि सौरव लुथरा यांच्या भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरु करण्यात आली असल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.

लथुरा बंधूंनी या प्रकरणात (Goa Night Club Fire Tragedy) अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. त्यांच्या या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार होती मात्र त्यापूर्वीच त्यांना थायलंड पोलिसांनी अटक केली आहे.

गोव्यातील बिर्च बाय रोमिया लेन येथे 6 डिसेंबरच्या रात्री आग लागली होती. या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर लुथरा बंधू देश सोडून फरार झाले होते. दोघेही थायलंडची राजधानी फुकेटमध्ये लपून बसले होते. या प्रकरणात सीबीआयने इंटरपोलद्वारे त्यांच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीर जारी केला होता. यानंतर थायलंड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे. तसेच गोवा पोलिसांनी थायलंडला जाण्याची आणि दोन्ही आरोपींना भारतात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुथरा बंधूंनी 7 डिसेंबर रोजी पहाटे 1:17 वाजता मेकमायट्रिपवर थायलंडला जाण्यासाठी इंडिगो फ्लाइट बुक केली. त्यांनी दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जही दाखल केला, जो फेटाळण्यात आला. तर दुसरीकडे त्यांच्या वकिलांनी त्यांच्या बाजूने न्यायालयात सांगितले की ते देश सोडून पळून गेले नव्हते तर व्यवसायाच्यानिमित्त थायलंडला जात होते आणि त्यांनी आधीच विमान बुक केले होते. वकिलांनी असाही युक्तिवाद केला की ते नाईट क्लबचे मालक नव्हते, तर त्याचे संचालक होते.

 पाच आरोपींना अटक

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्थापन केलेल्या तीन सदस्यीय तपास पथकाकडून गोवा नाईट क्लब घटनेची चौकशी केली जात आहे. गोवा पोलिसांनी आतापर्यंत क्लबचे मुख्य व्यवस्थापक राजीव मोडक, व्यवस्थापक विवेक सिंग, बार व्यवस्थापक राजवीर सिंघानिया आणि गेट व्यवस्थापक प्रियांशु ठाकूर यांच्यासह पाच जणांना या प्रकरणात अटक केली आहे.

Goa Night Club Fire Tragedy : गोवा नाईटक्लब आग प्रकरण, थायलंडमध्ये लुथरा बंधूंना अटक

भरत कोहली आणि अजय गुप्ता या दोन कर्मचाऱ्यांना दिल्लीत अटक करण्यात आली. अजय गुप्ता यांना गोवा पोलिसांनी ट्रान्झिट रिमांडवर घेतले होते आणि इतर आरोपींना सहा दिवसांच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

follow us