गोव्यातील नाईट क्लबमध्ये भीषण आग, 23 जणांचा मृत्यू ; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Goa Nightclub Fire Incident : शनिवारी रात्री दक्षिण गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला

  • Written By: Published:
Goa Nightclub Fire Incident

Goa Nightclub Fire Incident : शनिवारी रात्री दक्षिण गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे 50 जण जखमी असून त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती गोवा पोलिसांकडून देण्यात आली आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली असा दावा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आगीच्या घटनेवर दुःख व्यक्त करत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

या दुर्दैवी घटनेची माहिती देताना गोवा पोलीस महासंचालक आलोक कुमार (Alok Kumar) म्हणाले की, अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये ही दुर्दैवी घटना रात्री 12.40  च्या आसपास (Goa Nightclub Fire Incident) घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, आग्निशमक दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचले होते. आग आता आटोक्यात आली असून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला असून घटनेचे कारण तपासण्यात येत आहे. तर दुसरीकडे नाईट क्लबजवळील एका रेस्टॉरंटमधील सुरक्षा रक्षकाने सांगितले की, आम्हाला मोठा स्फट ऐकू आला आणि नंतर आम्हाला कळले की आग सिलिंडरच्या स्फोटामुळे लागली आहे.

मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देखील या घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याशी बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, गोव्यातील अर्पोरा येथील आगीची घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. मी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी परिस्थितीबद्दल बोललो. राज्य सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये देण्यात येतील. जखमींना 50,000 रुपये मिळतील.

मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे दिले आदेश

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, आज गोव्यात आपल्या सर्वांसाठी खूप दुःखद दिवस आहे. अर्पोरा येथे लागलेल्या भीषण आगीत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. मी खूप दुःखी आहे आणि या अकल्पनीय नुकसानाच्या वेळी सर्व शोकग्रस्त कुटुंबांना माझी मनापासून सहानुभूती व्यक्त करतो.

उत्पन्नात होणार वाढ, व्यवसाय वाढणार; जाणून घ्या या राशींसाठी 7 डिसेंबर कसा असेल?

मी घटनास्थळाला भेट दिली आणि घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत आगीचे नेमके कारण आणि अग्निसुरक्षा नियम आणि इमारतीचे नियम पाळले गेले की नाही हे निश्चित केले जाईल. जबाबदार आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार शक्य तितकी कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही निष्काळजीपणावर कठोर कारवाई केली जाईल.

follow us