Luthra Brothers Arrest : लुथरा बंधूंचे थायलंडहून भारतात प्रत्यार्पण; गोवा पोलिसांना ट्रान्झिट रिमांड मंजूर

Luthra Brothers Arrest : गोव्याातील एका नाईटक्लब आग प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांना गोवा पोलिसांनी थायलंडहुन भारतात

  • Written By: Published:
Luthra Brothers Arrest

Luthra Brothers Arrest : गोव्याातील एका नाईटक्लब आग प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांना गोवा पोलिसांनी थायलंडहुन भारतात आणले आहे. आज त्यांना दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरुन गोव्यात गोवा पोलीस घेऊन जाणार आहे. तर दुसरीकडे न्यायालायने दोन्ही आरोपींना दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर पाठवले आहे.

नवी दिल्लीत लुथरा बंधूंना (Luthra Brothers Arrest) ताब्यात घेतल्यानंतर आणि ट्रान्झिट रिमांड (Transit Remand) घेतल्यानंतर, गोवा पोलिस (Goa Police) दोन्ही आरोपींना गोव्यात आणत आहेत असल्यााची माहिती गोवा पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली.

नाईटक्लब आगीत 25 जणांचा मृत्यू

लुथरा बंधूंना त्यांच्या नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीप्रकरणी (Goa Fire Incident) ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला. आगीनंतर काही तासांनी गौरव आणि सौरभ फुकेटला पळून गेले. गौरव आणि सौरभ यांना पटियाला हाऊस न्यायालयात न्यायिक दंडाधिकारी ट्विंकल चावला यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी गोवा पोलिसांना लुथरा बंधूंसाठी दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला.

गोवा पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांनी तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडची विनंती केली आणि न्यायालयाला माहिती दिली की त्यांना शक्य तितक्या लवकर गोव्यात पाठवले जाईल.

सफदरजंग रुग्णालयात वैद्यकीय तपासणी

वृत्तानुसार,लुथरा बंधूंना दोन वेगवेगळ्या पोलिस वाहनांमधून न्यायालयात आणण्यात आले. दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. आगीनंतर, लुथरा बंधूंवर सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचे आरोप दाखल करण्यात आले आहेत. तपासकर्त्यांचा आरोप आहे की नाईट क्लबने अनिवार्य अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने ही घटना आणखी वाढली.

follow us