‘त्या’ चुकीमुळे तापमान थेट 52 डिग्री पार; Delhi Temperature मागील सत्य आलं समोर

‘त्या’ चुकीमुळे तापमान थेट 52 डिग्री पार; Delhi Temperature मागील सत्य आलं समोर

Delhi High Temperature is error in sensor says IMD : आज राजधानी दिल्लीतून ( Delhi ) धक्कादायक बातमी आली ती म्हणजे तापमानाचा पारा ( High Temperature ) तब्बल 52.3 अंश सेल्सिअसवर गेला. यामुळे देशात चिंतेच वातावरण निर्माण झालं. मात्र या तापमान वाढीमागील सत्य समोर आलं आहे. यावर हवामान विभागाने ( IMD ) स्पष्टीकरण दिलं आहे. ही तापमान नोंद सेन्सरमधील त्रुटीमुळे झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

विजय ताड खून प्रकरण : दीड वर्षापासून फरार असलेला माजी नगरसेवक अखेर शरण

नेमकं प्रकरण काय?

राजधानी दिल्लीत उष्णतेचे सगळेच रेकॉर्ड मोडले गेले आहेत. आज येथे उष्णता इतकी वाढली होती की तापमान राजस्थानातील शहरेही मागे पडली आहेत. आज दिल्लीतील मुंगेशपूर भागात सर्वाधिक म्हणजेच तापमान तब्बल 52.3 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार आज दुपारी दिल्लीत पारा 50 डिग्रीच्या पुढे गेला. मुंगेशपूर भागात दुपारी अडीच वाजता तापमान 52.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. मागील काही दिवसांपासून दिल्लीतील तापमानात मोठी वाढ होत आहे. दिल्लीचे उपराज्यपालांनी आज मोठा निर्णय घेत कामगारांना दुपारी 12 ते 3 यावेळेत पगारी सुट्टी जाहीर केली.

मात्र आता या तापमान वाढीमागील सत्य समोर आलं आहे. हवामान विभागाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं. दिल्लीतील मुंगेशपूर भागात नोंदवण्यात आलेल्या सर्वाधिक 52.3 अंश सेल्सिअस तापमान हा आकडा चुकीचा आहे. ती तापमान नोंदवणाऱ्या सेन्सरमधील चूक होती. त्यामुळे चुकीचं तापमान नोंदवल गेलं. मुंगेशपुरमध्ये 52.3 अंश सेल्सिअस नाही. तर 49 पॉईंट एक अंश सेल्सियस असे तापमान होतं. असे स्पष्टीकरण भारतीय हवामान विभागाने दिलं आहे.

नार्को टेस्टमध्ये मी निर्दोष आढळलो तर संन्यास घेणार का? अजित पवारांचे दमानियांना जोरदार प्रत्युत्तर

दरम्यान दुपारनंतर मात्र दिल्लीतील तापमानात अचानक बदल झाला. पावसाने हजेरी लावली त्यामुळे तापमान कमी झाले. कडाक्याच्या उन्हातून दिल्लीकरांची सुटका झाली. परंतु, आजचा बुधवारचा दिवस दिल्लीकरांसाठी चांगलाच हैराण करणारा ठरला. फक्त दिल्लीच नाही तर उत्तर भारतातील अन्य शहरांतही आज तापमानात मोठी वाढ झाली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज