Delhi airport ; स्पाइसजेट विमानाला अचानक आग; दिल्ली विमानतळावर गोंधळ

Delhi airport ; स्पाइसजेट विमानाला अचानक आग; दिल्ली विमानतळावर गोंधळ

Delhi airport : दिल्ली विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानाला इंजिन देखभालीदरम्यान आग लागली होती. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. विमान आणि देखभाल कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आणि मोठा अपघात टळला आहे. विमान वाहतूक नियामक डीजीसीए या प्रकरणाची चौकशी करत आहे.

विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा Q 400 विमानाची देखभाल सुरू होती, तेव्हा अचानक त्याच्या इंजिन क्रमांक 1 वर आग लागण्याचा फायर अलार्म वाजला. तत्काळ मेंटेनन्स कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने आग विझवली. खबरदारी घेत अग्निशमन दलाच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या घटनेत कोणाचेही नुकसान झालेले नाही.

या प्रकरणाला दुजोरा देताना डीसीपी विमानतळ म्हणाले की, विमानाच्या एसीमध्ये दुरुस्तीदरम्यान आग लागली. या प्रकरणी विमानतळावर पोलिसांना पाचारण करण्यात आले नाही, तसेच पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली नाही.

टीम इंडियाच्या कर्णधाराला आयसीसीचा झटका, दोन सामन्यांची बंदी

विमान वाहतूक नियामक DGCA ने स्पाईसजेटला ‘close monitoring’च्या सूचीतून काढल्यानंतर ही घटना घडली. या घटनेनंतर एअरलाइनच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या पावसाळ्यात घडलेल्या घटनांमुळे तसेच अपुऱ्या देखभालीमुळे ‘close monitoring’सुरु होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube