Shashi Tharoor English : खासदार शशी थरूरांच्या इंग्लिशवरील ‘तो’ विनोद तरूणाने केला खरा
नवी दिल्ली : कॉंग्रेस खासदार शशी थरूर त्यांच्या इंग्लिश भाषेवरील प्रभुत्वासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या इंग्लिशचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर त्याची अनेकदा झलक पाहायला मिळते. कारण ते असे काही इंग्लिश शब्द वापरतात ते समजून घेण्यासाठी अक्षरशः आपल्याला डिक्शनरी घेऊन बसावे लागेल. हा गमतीचा भाग असला तरी एका तरूणाने हे खरंच केलं आहे.
कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांच्या एका कार्यक्रमामध्ये थरूर यांचे इंग्लिश भाषेतील भाषण ऐकण्यासाठी एक तरूण अक्षरशः डिक्शनरी घेऊन गेला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये या तरूणाने आपल्या जवळील डिक्शनरी आणि पुढे सुरू असलेलं कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांचं भाषण दाखवलं आहे.
Someone in Nagaland literally brought Oxford Dictionary to my show to listen to Dr. @ShashiTharoor. 😅
Bringing Dictionary along was just a joke statement until I saw this. pic.twitter.com/Qiz3E2sv3i
— R Lungleng (@rlungleng) February 26, 2023
कॉंग्रेस खासदार शशी थरूर नगालॅंडमध्ये एका कार्यक्रमाला गेले होते. तेथील हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘डॉ. शशी थरूर यांना ऐकण्यासाठी नागालँडमधील कोणीतरी माझ्या शोमध्ये अक्षरशः ऑक्सफर्ड डिक्शनरी आणली होती. मी पाहिल्याशिवाय डिक्शनरी आणणे ही एक विनोद आहे असे मला वाटायचे.’
Shashi Tharoor & Narendra Modi : अन् चक्क शशि थरूरांनी केले मोदींचे कौतुक, मोदी म्हणाले..
शशी थरूर त्यांच्या इंग्लिश भाषेवरील प्रभुत्वाबद्दल सांगायचे झाले तर शशी थरूर यांनी सोशल मीडियावर अनेकदा कठीण शब्द लिहित असतात. असाच एक शब्द त्यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात वापरला होता – Quomodocunquize. याचा अर्थही त्यांनी सांगितला. या शब्दाचा अर्थ कोणत्याही किंमतीत पैसा कमवणे असा आहे. अशा प्रकारच्या त्यांच्या शब्दांमुळे ते नेहमी चर्चेतही येत असतात.