… म्हणून संजय राऊतांना अटक, ‘नरकातला स्वर्ग’ प्रकाशन सोहळ्यात शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On Narkatla Swarg : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ (Narkatla Swarg) पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईतील प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिर येथे पार पडला. या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , टीएमसीचे खासदार साकेत गोखले (Saket Gokhale) देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी शरद पवार म्हणाले की, ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी संजय राऊत कायम बोलत असतात. अन्यायाविरोधात सामानातून ते आपली रोकठोक भूमिका मांडत असतात. मागच्या काळात राऊतांच्या भूमिकेने काही लोक अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांना अटक झाली. असं म्हणत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर हल्लाबोल केला. तसेच संजय राऊतांनी पुस्तक लिहून फार मोठं काम केलं आहे. असं देखील शरद पवार म्हणाले.
तर संजय राऊत यांचं पुस्तक प्रसिद्ध होणार आहे, हे आपण गेल्या दोन दिवसांपासून ऐकत आहोत. मला आश्चर्य वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना ते पुस्तक न वाचता कसं समजलं? या पुस्तकावर प्रचंड टीका केली जात आहे. राऊतांवरही गेल्या दोन दिवसांपासून टीका केली जात आहे. कोणी सांगितलं की मी बालसाहित्य वाचत नाही. कोणी आणखी काही टीका केली. असं देखील शरद पवार म्हणाले.
कार खरेदीची सर्वात भारी संधी, मारुती देत आहे 1.15 लाख रुपयांची सूट
तर दुसरीकडे मी संपादकीय लिहतो त्याची राज्यभर चर्चा होते तर मी पुस्तक लिहल्यावर ती व्हायलाच पाहिजे. गेली चार-पाच दिवसांपासून अनेकांना मिर्च्या लागल्यात. हे लिहलं ते लिहलं अश्या आशयाने जोरदार चर्चा सुरू आहे. का होणार नाही व्हायलाच पाहिजे कारण मी लिहलंय ते सत्य लिहलं असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.