लोकसभेत दणकावून भाषण ठोकणारे सुळे, शिंदे पाकला टप्प्यात घेणार; मिळाली मोठी जबाबदारी

Modi Govt Form Delegation Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर (India Vs Pak) कडक कारवाई केली. भारताने पाकव्याप्त काश्मीर (Pok) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवून पाकला सडेतोड उत्तर दिलं. दरम्यान, मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका अधोरेखित करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे एक शिष्टमंडळ तयार केलं. हे शिष्टमंडळ परदेशात जाऊन भारताची भूमिका मांडणार आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती आहे.
पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात 2 वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक; NIA ची मोठी कारवाई
हे शिष्टमंडळ अमेरिकेत जाऊन पाकिस्तानची पर्दापाश करणार आहे. यात खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांना देखील स्थान देण्यात आले आहे.
In moments that matter most, Bharat stands united.
Seven All-Party Delegations will soon visit key partner nations, carrying our shared message of zero-tolerance to terrorism.
A powerful reflection of national unity above politics, beyond differences.@rsprasad @ShashiTharoor… pic.twitter.com/FerHHACaVK— Kiren Rijiju (@KirenRijiju) May 17, 2025
पाकिस्तानच्या कारवायांनंतर सर्वच नेते आपले राजकीय मतभेद विसरून एकत्र उभे असल्याचं दिसून येतं. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकला चांगलाच धडा शिकवला. या निर्णायक कारवाईला केवळ जनतेकडूनच नव्हे तर विरोधी पक्षांकडूनही पूर्ण पाठिंबा मिळत आहे. आता संसदीय कामकाज मंत्रालयाने परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय संसदीय शिष्टमंडळांचे नेतृत्व करणाऱ्या खासदारांची नावे जाहीर केली आहेत. हे खासदार अमेरिकेत पाकिस्तानचा पर्दाफाश करणार आहेत.
I am honoured by the invitation of the government of India to lead an all-party delegation to five key capitals, to present our nation’s point of view on recent events.
When national interest is involved, and my services are required, I will not be found wanting.
Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/b4Qjd12cN9
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) May 17, 2025
सात जण शिष्टमंडळांचे नेतृत्व करणार
पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी सात खासदार परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळांचे नेतृत्व करतील.
शशी थरूर – अमेरिका
विजयंत जय पांडा – पूर्व युरोप
कनिमोझी – रशिया
संजय झा – आग्नेय आशिया
रविशंकर प्रसाद – मध्य पूर्व
सुप्रिया सुळे – पश्चिम आशिया
श्रीकांत शिंदे – आफ्रिकन देश
दरम्यान, परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळात सुमारे ४३/४५ खासदारांची नावे समाविष्ट केली जाणार असून, यात समोर आलेल्या माहितीनुसार खालील खासदारांची नावे असल्याचे सांगितले जात आहे.
प्रेमचंद गुप्ता, राजद
संजय झा, जेडीयू – जपानला जाणार
रविशंकर प्रसाद, भाजप – मध्य पूर्वेत जाणार
विजयंत जय पांडा – भाजप
अनुराग ठाकूर – भाजप
ब्रिजलाल, भाजप
तेजस्वी सूर्या, भाजप
अपराजिता सारंगी, भाजप
राजीव प्रताप रुडी, भाजप
डी पुरंदेश्वरी – भाजप
श्रीकांत शिंदे – शिवशिव शिंदे
सुप्रिया सुळे – राष्ट्रवादी (शरद पवार)
सस्मित पात्रा – (बीजेडी)
समिक भट्टाचार्य – (भाजप)
मनीष तिवारी – (काँग्रेस)
शशी थरूर – काँग्रेस
अमर सिंह – काँग्रेस
प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना उद्धव
जॉन बिट्स – सीपीआय एम
असदुद्दीन ओवैसी – एआयएमआयएम
दरम्यान, पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतानं पाकिस्तानचे सर्व हल्ले परतून लावले. प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. त्यांचे अनेक हवाई तळ आणि रडार प्रणाली नष्ट झाली. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली.