लाडक्या बहिणींसाठी धावले नेतेमंडळी; जनसेवे आड विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू…

लाडक्या बहिणींसाठी धावले नेतेमंडळी; जनसेवे आड विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू…

Political Leaders helps for Ladaki Bahin Yojana in Ahmednagar : लाडकी बहीण योजनेसाठी (Ladaki Bahin Yojana ) महिलांना अडचणी येऊ नये म्हणून अहमदनगरमध्ये आपल्या लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी आता नेतेमंडळी (Political Leaders) देखील रिंगणात उतरले आहे. दरम्यान आगामी काळात निवडणुका आहेत. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असतानाच अशा प्रकारे लाभार्थी महिलांना मदत करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रत्न केला जात आहे.

टीम इंडियाचे शिलेदार मोदींच्या भेटीला; खास वेलकम करत मोदींनी दिल्या शुभेच्छा

राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. या अंतर्गत पात्र महिलांना शासनाकडून दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहे. त्यासाठी पात्र महिलांना शहरातील आपलं सरकार केंद्र, तहसील, तलाठी कार्यालय, सेतू कार्यालयात अर्ज भरावा लागणार आहे. दरम्यान ऑनलाईन लिंक उपल्बध नसल्याने ऑफलाईन पद्धतीने कागदपत्र जमा करवून घेतले जात आहे. यात अनेक नेतेमंडळींनी आपापल्या कार्यालयात हे कागदपत्र जमा करून घेण्याची सोय उपल्बध करून दिली आहे.

धनंजय मुंडेंच्या हातात काहीच नाही; परळीत दहशद वाल्मिक कराडांची, रोहित पवारांचा घणाघात

नुकताच राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी एक महत्वाची योजना राबवण्याचे जाहीर केले. अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली. मात्र या योजनेला पहिल्या दिवसापासूनच अडचणीचा मोठा सामना करावा लागला. ऑनलाईन फॉर्म, किचकट कागदपत्र, तांत्रिक अडचणी यामुळे लाडक्या बहिणी देखील रुसल्या. मात्र शासनाने यामध्ये तातडीने सुधारणा करून काही किचकट अटी हटवल्या व अर्ज दाखल करण्यास मुदत वाढ दिली. यामुळे आता या योजनेला पुन्हा एकदा चांगला प्रतिसाद मिळतआहे.

येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका या होणार आहे. त्यानुषंगाने विद्यमान लोकप्रतिनिधी व त्याचबरोबर इच्छुक असलेले नेतेमंडळी आतापासूनच विधानसभेची तयारी करत आहे. यातच राज्य सरकारने लागू केलेली लाडकी बहीण योजनेसाठी सध्या अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामुळे या बहिणींसाठी आता नेतेमंडळी त्यांचे भाऊ बनून या रिंगणात उतरले आहे. अनेक ठिकाणी नेतेमंडळी यांनी आपापल्या कार्यलयाच्या आवारात हे फॉर्म जमा करून घेण्यासाठी स्टोल उभारले आहे. त्याठिकाणी नेत्यांचे मोठं मोठे फ्लेक्स उभारणार आले आहे. मतदार राजाची सेवा करता करता येणाऱ्या निवडणुकीत मेवा खाण्याची संधी पुढारी मंडळी सोडत नसल्याचे यामाध्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

अटी शिथिल

शासनाची महत्वकांक्षी असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनासाठी सरकारने यातील अनेक अटी शिथिल केल्या. यानुसार 21 ते 65 वयोगटातील महिलांचा यात समावेश करण्यात आला असून, उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसल्यास पिवळे वा केशरी शिधापत्रिका धारकांना लाभ घेता येईल. तसेच लाभार्थींना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube