फुकट्यांचे ‘गोल्डन डे’ ज संपणार; फडणवीसांनी ‘बटव्या’तून काढलं कायमचं सोल्युशन

आगामी 2 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य सरकार गोल्डन डेटा जाहीर करणार आहे.

  • Written By: Published:
फुकट्यांचे 'गोल्डन डे' ज संपणार; फडणवीसांनी 'बटव्या'तून काढलं कायमचं सोल्युशन

Maharashtra Government Doldan Data Know About It : फडणवीस सरकार येत्या 2 ऑक्टोबर 2025 रोजी गोल्डन डेटा जाहीर करणार आहे. त्यामुळे बोगस लाभार्थ्यांचे आता सुगीचे दिवस संपुष्टात येणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या या गोल्डन डेटामुळे नव्या योजनांसाठी सर्व्हे करण्याची गरजचही संपुष्टात येणार आहे. नवी योजना राबवताना सर्व्हे करण्याऐवजी गोल्डन डेटाचा वापर करण्यात येणार आहे. गोल्डन डेटाद्वारे सर्व माहिती एका क्लिकवरती उपलब्ध होणार आहे. हा गोल्डन डेटा नेमका काय? ते जाणून घेऊया.

फडणवीस सरकारने का आणला गोल्डन डेटा?

लाडकी बहीण योजनेत अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी तसेच अनेक पुरूष मंडळी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता सरकारने लाभार्थी महिलांना दोन महिन्यात ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. तसेच भविष्यातील सरकारी योजनांचा फुकट लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर चाप बसावा यासाठी हा गोल्डन डेटा तयार करण्यात आला आहे.

गोल्डन डाटात नेमकी कोणती माहिती असणार?

राज्य सरकारतर्फे तयार करण्यात येणाऱ्या या गोल्डन डेटामध्ये सर्व नागरिकांची इत्थंभूत माहिती असणार आहे. त्यामुळे बोगस लाभार्थी रोखण्यासाठी राज्य सरकारचं हे मोठं पाऊल असल्याचं बोललं जात असून, या डेटामुळे नव्या योजनांसाठी सरकारला बोगस लाभार्थांचा शोध घेण्यासाठी सर्व्हे करण्याची आवश्यक्यता भासणार नसल्याचे सांगितले जात आहे.

एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती

14 ते 15 कोटींचा हा गोल्डन डेटा तयार करण्यात आला असून, आर्थिक, सामाजिक, भौगोलिक माहिती प्रत्येक नागरिकाची एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यापुढे जर कोणती योजना राबवायची असेल, तर सर्व्हे न करता थेट राबवता येणार आहे. एवढेच नाही तर गोल्डन डेटामधूनच लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांना शोधता आले. या डेटामधूनच जवळपास 26 लाख बोगस लाभार्थी लाडकी बहीण योजनेतून पुढे आलेत.

follow us