Sambhajiraje Chatrapati : कोणत्या मतदारसंघातून अर्ज भरणार? संभाजीराजेंनी क्लिअर केलं
Sambhajiraje Chatrapati News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षांकडून आपापले उमेदवार मैदानात उतरवले जात आहेत. अशातच महाविकास आघाडी आणि महायुतीला पर्याय म्हणून स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी राज्यातील विविध पक्षांना एकत्र करीत महाशक्ती परिवर्तन आघाडीची स्थापना केलीयं. परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून राज्यासमोर एक नवा पर्याय संभाजीराजेंनी दिलायं. या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे नेमकं कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. लेटस्अप मराठीच्या लेटसअप चर्चा या कार्यक्रमात संपादक योगेश कुटे यांनी संभाजीराजेंची मुलाखत घेतलीयं. यावेळी ते बोलत होते.
विधानसभेत रंगणार गुरू शिष्याची लढाई, मुंब्रात नजीम मुल्ला देणार जितेंद्र आव्हाडांना आव्हान
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी मी नाशिक मतदारसंघातून तयारी करत होता, त्यानंतर कोल्हापुरातून तयारी सुरु होती. आत्ता आम्ही महाशक्ती परिवर्तन आघाडीची स्थापना केली असून आघाडीच्या माध्यमातून राज्यभरात दौरा करायचा आहे. सध्याची अशी परिस्थिती असतानाच मी एखाद्या जागेसाठी कुठेतरी अडकून बसलो की मला महाशक्ती परिवर्तन आघाडीसाठी वेळ देता येणार नाही, त्यामुळे ही एक अडचण असून सध्या याबाबत मी उत्तर देऊ शकत नसल्याचं संभाजीराजेंनी क्लिअर केलंय.
खासगी वाहनावर लाल-निळा दिवा; तोतया आयपीएस अधिकारी बनून व्यावसायकाला घाता 1 कोटीचा गंडा
दरम्यान, राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमदेवारांची घोषणा होताच परिवर्तन महाशक्तीकडून 10 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये 10 जागांपैकी 4 जागा प्रहार जनशक्ती पक्षाला, तर दोन जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या. तर परिवर्तन महाशक्ती आघाडीने अचलपूरमधून बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात आलीयं. तर रावेरमधून अनिल चौधरी, चांदवड विधानसभा मतदारसंघातून गणेश निंबाळकर, देगलूर बिलोलीमधून सुभाष साबणे, ऐरोलीमधून अंकुश कदम, हदगाव हिमायतनगरमधून माधव देवसरकर, हिंगोलीमधून गोविंदराव भवर, राजुरामधून वामनराव चटप यांनी विधानसभेसाठी तिकीट देण्यात आले आहे.