संभाजीराजे छत्रपतींवर गुन्हा! पोलिसांचं मौन; संभाजीराजेंनी क्लिअर सांगितलं
SambhajiRaje Chatrapati : माझ्यावर पोलिस शाहुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा झालायं का? याबाबत पोलिसांनी हो, नाही काहीच बोलले नसल्याचं खुद्द संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati ) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. दरम्यान, विशाळगड अतिक्रमण प्रकरणी संभाजीराजेंसह 500 ते 600 शिभक्तांवर गुन्हा दाखल झाल्याचं सांगण्यात येत होतं. या प्रकरणी शिवभक्तांची धरपकड करण्यापेक्षा मलाच जबाबदार धरुन माझ्यावर गुन्हा दाखल करा, असं संभाजीराजेंनी पोलिस ठाण्यात सांगितलंय. यावेळी संभाजीराजेंनी पोलिस ठाण्यात तब्बल दीड तास ठिय्या मांडला होता.
ठाकरेंचा विश्वासघात करणारे हिंदू असू शकत नाही; शंकराचार्यांचं मोठं विधान
संभाजीराजे म्हणाले, विशाळगड अतिक्रमणामध्ये अनेकांचं अतिक्रमण आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी अतिक्रमण काढण्यात आलं होतं त्यामध्ये काही हिंदू लोकांचंही अतिक्रमण होतं. त्यामुळे कोणीही या मोहिमेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नका, मी आक्रमक माझ्या स्वार्थासाठी नाही तर विशाळगडासाठी झालो असल्याचं संभाजीराजेंनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलंय.
IAS पूजा खेडकरवर आरोप! …तर मी राजीनामा द्यायला लावतो; वडील थेटच बोलले
तसेच विशाळगड अतिक्रमण कारवाई प्रकरणी पोलिसांकडून अनेक शिवभक्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माझ्यावरही गुन्हा दाखल झाला असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे पोलिसांच्याआधी मी स्वत:च शाहूवाडी पोलिस ठाण्यात हजर झालो आहे. याबाबत पोलिसांशी बराच वेळ चर्चा झाली असून माझ्यावर गुन्हा दाखल झालायं का याबाबत विचारणा केली असता, पोलिसांकडून होय, नाही, काहीच उत्तर आलं नसल्याचं संभाजीराजेंनी माध्यमांशीस बोलताना सांगितलंयं.
अतिक्रमणाच्या कारवाईप्रकरणी शाहू महाराजांची दोन भूमिका घेतल्या आहेत. एक वडीलांची आणि दुसरी म्हणजे खासदार म्हणून विशाळगड अतिक्रमणाबाबतचा विषय कोल्हापुरातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सुटणार नसून तो वरिष्ठ पातळीवर सुटणार असल्याचं संभाजीराजेंनी शाहू महाराजांना सांगितलं. त्यावर ते म्हणाले मुख्यमंत्र्यांसमोर हा प्रश्न सुटेल का? शाहू महाराजांच्या प्रश्नावर संभाजीराजे म्हणाले, मुख्यमंत्री, उपममुख्यमंत्र्यांसमोर हा प्रश्न सुटणार असल्याचं मी सांगितलं. मात्र, मला त्या चर्चेला बोलावलं नसल्याचं खुद्द संभाजीराजेंनी सांगितलं आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशाने कारवाई करणार का?
संभाजीराजे छत्रपती यांच्यावर विशाळगड अतिक्रमण मुद्द्यावरुन जिल्ह्याचे पालकमंत्री पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश कधी देणार आहेत. पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरच पोलिस गुन्हा दाखल करणार आहेत की काय? असा सवाल यावेळी संभाजीराजेंनी केलायं.