IAS पूजा खेडकरवर आरोप! …तर मी राजीनामा द्यायला लावतो; वडील थेटच बोलले

IAS पूजा खेडकरवर आरोप! …तर मी राजीनामा द्यायला लावतो; वडील थेटच बोलले

IAS Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत. लाल दिवा ते केबिन प्रकरणावरुन खेडकर चांगल्याच चर्चेत आहेत. त्यात आता अपंग आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रावरूनही त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. या आरोपांवरुन आयएएस पूजा यांचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलंय. प्रशिक्षणार्थीला केबिन देऊ नये, असं कुठं लिहिलं असेल तर मी पूजाला राजीनामा द्यायला लावतो, या शब्दांत खेडकर यांनी आरोपांवर उत्तर दिलंय.

भुजबळ हा बेईमान माणूस, ज्याचं खातो, त्याचे वाईट करतो…; भुजबळ-पवार भेटीवरून जरांगेंचा हल्लाबोल

पुण्यात प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी आपल्या खाजगी वाहनाला (ऑडी) कारला लाल दिवा लावल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. तर दबाव आणून स्वतंत्र केबिनची व्यवस्था करण्यात यावी, अशी आग्रही मागणी पूजा खेडकर यांनी पुण्यात असताना केल्याचं आरोप होत आहे. या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात पोस्टिंग करण्यात आलीयं. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पूजाने अपंगत्वाचं खोटं प्रमाणपत्र सादर केलं असल्याचा दावा केलायं.

या संपूर्ण आरोपांवर बोलताना दिलीप खेडकर म्हणाले, पूजाने नियमांनूसारच काम केलं असून काहीही चुकीचं वागलेली नाही. वरिष्ठांसोबत बोलणं करुनच तिने खाजगी वाहनावर लाल दिवा लावला होता. तिने सादर केलेली सर्व प्रमाणपत्र खरे असल्याचं दिलीप खेडकर यांनी स्पष्ट केलंय.

आयएएस पूजा खेडकरचे कारनामे संपेनात; प्रयत्न संपल्यानंतर नाव बदलून दिली ‘UPSC’ची परीक्षा

…तर राजीनामा द्यायला लावतो
एक महिला, तरुण मुलगी असेल तर तिने सर्वसामान्यांच्या वॉशरुममध्ये जाणं बरोबर आहे का? तिला काही अडचणी असतात. प्रशिक्षणार्थीला केबिन देऊ नये, असं कुठं लिहून ठेवलं असेल तर पूजाला राजीनामा द्यायला लावतो, तिला स्वत: अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी केबिनबाबत सांगितलं आहे. तिने केबिनसाठी दबाव आणला नसल्याचं दिलीप खेडकर म्हणाले आहेत.

राज्यातील आयएएस अधिकारी पाहता त्यांना कार्यालयीन वापरासाठी गाड्या दिलेल्या असतात. पूजा ही प्रशिक्षणार्थी असली तरी शासकीय विभागात जाऊन तिला प्रशिक्षण घ्यायचं होतं. त्यामुळे रुजू झाल्यानंतर तिने कुठे बसू विचारलं तेव्हा गाडी आणि कार्यालय मिळणार नसल्याचं तिला सांगण्यात आलं.दुसऱ्या दिवशी तिला मतदान केंद्रावर ड्यूटीसाठी पोहोचायचं होतं. तिने नातेवाईकांची गाडी घेऊन मतदान केंद्रावर पोहोचली. तिथे तिला 2 किमी अंतरावल डावलण्यात आलं.

अधिकारी असल्याचं सांगूनही ऐकलं नसल्याचं खेडकरांनी स्पष्ट केलंय. तसेच तुमच्या गाडीवर तसं काही नाहीये त्यामुळे तुम्हाला आतमध्ये सोडता येणार नाही. गाडी पार्क करुन तिने वरिष्ठाना फोन केला मात्र सोय झाली नाही. त्यामुळे तिने जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घालून गाडीचं झालं तर बरं होईल अशी विनवणी केली. तेव्हा तुम्ही भाड्याने गाडी घ्या , असं सांगण्यात आलं. त्यावर महाराष्ट्र शासन आणि लाल दिवा लावायला सांगितलं असल्याचंही खेडकर यांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube