खासदार मेधा कुलकर्णींवर धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा — अजित पवार गटाची मागणी

पुण्यात भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे, असा आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे.

Ajit Pawar Ncp Allegations

Rupali Thombre Demands File Case Against MP Medha Kulkarni : पुण्यात भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे, असा गंभीर आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

गुन्हा दाखल करा

रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombre) म्हणाल्या की, पुण्यातील शांतता आणि ऐक्य धोक्यात येईल असे वक्तव्य मेधा कुलकर्णी करत आहेत. त्या विसरल्या आहेत की त्या खासदार आहेत. पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचं काम त्या (MP Medha Kulkarni) करत आहेत. कोथरूडमध्ये नाटकं केली, आता कसब्यातून पुन्हा वातावरण पेटवायचा प्रयत्न सुरू (Ajit Pawar) आहे.

पुण्यातील धार्मिक वातावरण

रूपाली पाटील पुढे म्हणाल्या, शनिवारवाडा कोणाच्या बापाचा नाही. तो मराठा साम्राज्याच्या पेशव्यांचा आणि सर्व पुणेकरांचा आहे. खासदार बाईंनी केलेल्या कृत्यामुळे पुण्यातील सौहार्द धोक्यात येत आहे. त्यांनी शनिवारवाड्यात जे नाटक (Pune News) केलं, त्यावर तातडीने गुन्हा दाखल व्हायला हवा. भाजपनेही त्यांना आवर घालावा. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, खासदारकीची घेतलेली शपथ विसरून मेधा कुलकर्णी पुण्यातील धार्मिक वातावरण जाणीवपूर्वक बिघडवतात. त्यांच्या अशा कृत्यांना आळा घालणं गरजेचं आहे. प्रार्थना असो किंवा दुवा — श्रद्धा एकच असते, हे त्या विसरत आहेत.

राजकीय वातावरण चांगलंच तापलं

पुण्यात सध्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी राष्ट्रवादीकडून कारवाईची जोरदार मागणी होत आहे. पुण्यात भाजपने खासदार मेधा ताई यांना आवरा बाबा, असं देखील रूपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

follow us