पूजा खेडकरच्या वडिलांना दिलासा! प्रल्हाद कुमार अपहरण प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
Dilip Khedkar यांच्यावर प्रल्हाद कुमार अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

Dilip Khedkar got anticipatory Bail in Prahlad Kumar Kidnapping Case : वादग्रस्त निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरामा खेडकरणे मिक्सर ट्रक चालकाचे अपहरण करून दाबून ठेवलं होतं. त्यानंतर या प्रकरणी मुख्य आरोपी दिलीप खेडकर प्रफुल साळुंखे आणि मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील प्रफुल साळुंखेला अटक करण्यात आली आहे. तर मुख्यआरोपी दिलीप खेडकर अद्याप फरार मात्र आता त्याला उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
13 सप्टेंबर रोजी सायंकाळी मुलुंड ते ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि एका कारचा अपघात झाला मध्ये चालक चंद्रकुमार चव्हाण आणि हेल्पर प्रल्हाद कुमार हे दोघे होते तर कारमध्ये दोन अज्ञात व्यक्ती होते अपघातानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला आणि त्याचवेळी कारमधून दोघांनी हेल्पर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीने कार मध्ये बसून घेतलं. त्यांनी ट्रक आमच्या मागे आणि असे चालकाला बजावलं मात्र काही अंतरावर गेल्यावर कार नजरेआड झाली घाबरलेल्या ट्रक चालकांनी घटनेची माहिती ट्रक मालक विलास ढेंगरे यांना दिली.
ग्रीन कार्डधारकांनो सावधान! ओळखपत्र जवळ न ठेवल्यास दंड किंवा अटक होऊ शकते
तात्काळ नवी मुंबईच्या रवाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार केली तक्रार दाखल होतास पोलिसांनी तपास सुरू केला. त्यामध्ये ही कार पूजा खेडकर यांच्या पुण्यातील घरात उभी असल्याचे निष्पन्न झालं त्यामुळे तात्काळ नवी मुंबई पोलिसांची टीम खेडकर यांच्या घरी पोहोचले मात्र यावेळी पूजा खेडकर ची आई म्हणजेच मनोरमा खेडकर ने गेट उघडण्यास नकार दिला पोलिसांनी छाननी सुरू केली असता हेल्पर प्रल्हाद कुमारची सुटका करण्यात आली.
ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! तेलंगणा सरकारच्या 67 टक्के आरक्षणाला धक्का
त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र मनोरमा खेडकर यांनी ही अपघातातील कार त्यांच्या घरी सापडणे तसेच प्रल्हाद कुमार देखील त्यांच्या घरी सापडणे हा सर्व प्रकार आपल्याला फसवण्यासाठी केला जात असल्याचा दावा केला तपासात सहकार्याचा आश्वासन दिले आणि अटकेपासून संरक्षण मिळवला आहे मात्र त्यांनी तपासात कोणतेही सहकार्य न करता फरार झाले आहेत मनोरमा खेडकर आणि त्यांचे पती दिलीप खेडकर हे दोघेही सध्या फरार आहेत