आयएएस पूजा खेडकरचे कारनामे संपेनात; प्रयत्न संपल्यानंतर नाव बदलून दिली ‘UPSC’ची परीक्षा

आयएएस पूजा खेडकरचे कारनामे संपेनात; प्रयत्न संपल्यानंतर नाव बदलून दिली ‘UPSC’ची परीक्षा

IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे काही संपता सपेनात. रोज नवे कारनामे समोर येत आहेत. आता त्यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. (Manorama Khedkar) यूपीएससीचे सर्व प्रयत्न संपल्यानंतर पूजा खेडकर (Pooja Khedkar)  यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी तब्बल ११ वेळा परीक्षा दिली आहे.

तब्बल ११ वेळा परीक्षा दिली वादग्रस्त IAS पूजा खेडकरचे पाय खोलात; थेट पीएमोने घेतली दखल, अहवाल पाठवण्याचे आदेश

खेडकर पूजा दिलीपराव या नावाने त्यांनी २०२०-२१ पर्यंत परीक्षा दिली. त्यानंतर २०२१-२२ मध्ये त्यांनी आपल्या नावात बदल केला आणि परीक्षा दिली आहे. त्यांनी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव बदलून प्रयत्न संपल्यानंतरही दोनवेळा परीक्षा दिली आहे. सर्वसामान्यपणे पूजा खेडकर यांना ओबीसी कोट्यातून ९ वेळा परीक्षा देता येत होती. पण, त्यांनी नावात बदल करून तब्बल ११ वेळा परीक्षा दिली असल्याचं उघड झालं आहे.

पीएमोने अहवाल मागवला नॉन-क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र कसं मिळालं? पूजा खेडकरच्या वडिलांचा मोठा दावा, म्हणाले

पूजा खेडकर पुण्यात असताना यांच्या अनेक मागण्यांमुळे त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांचे पाय खोलात जात असल्याचं चित्र आहे. कारण, पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतली आहे. शिवाय पीएमओने पूजा खेडकर यांचा अहवाल देखील मागवल्याची माहिती आहे. याप्रकरणी तपास सुरु असून काही अनियमितता आढळून आल्यास पूजा खेडकर यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

 गुन्हा दाखल पुजा खेडकरच्या आईचं पंकजा मुंडेंच्या कारखान्याशी कनेक्शन इतक्या लाख रुपयांचा दिला होता चेक

खेडकर यांनी नगरच्या सरकारी जिल्हा रुग्णालयातून अपंगत्वाचं सर्टिफिकेट घेतलं आहे. बहुनेत्र दोष आणि मानसिक आजार याबाबत त्यांना सर्टिफिकेट देण्यात आलं होतं. याचा फायदा घेऊन त्यांनी बहुविकलांगता कोट्यातून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामुळं त्यांचं हे सर्टिफिकेट देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. याप्रकरणीही तपास केला जात आहे. पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube