पुजा खेडकरच्या आईचं पंकजा मुंडेंच्या कारखान्याशी कनेक्शन; ‘इतक्या’ लाख रुपयांचा दिला होता चेक

पुजा खेडकरच्या आईचं पंकजा मुंडेंच्या कारखान्याशी कनेक्शन; ‘इतक्या’ लाख रुपयांचा दिला होता चेक

IAS Pooja Khedkar :  वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांचं रोज काहीतरी नवीन प्रकरण समोर येतय. नुकताच पूजा खेडकर यांच्या आई वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. ही घटना ताजी असतानाच (Manorama Khedkar) आता आणखी एक प्रकरण समोर आल आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक चेक अर्थात धनादेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण? मोठी बातमी! अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला, गोळी कानाला चाटून गेली

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावाने 12 लाख रुपयांचा चेक दिला होता. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने 19 कोटी रुपयांसाठी कारवाई केल्यानंतर मदतीचा ओघ राज्यभरातून येत होता. यावेळी मनोरमा खेडकर यांनी परिवर्तन प्रतिष्ठानच्या भालगाव नावाने 12 लाखांचा चेक दिला होता. हा चेक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनोरमा खेडकर या चर्चेत आल्या आहेत.

बायडेन यांनी कहरच केला.. कट्टर शत्रूलाच बनवले मित्र नाटो समिटमध्ये नक्की काय घडलं? 

गुन्हा का दाखल

पूजा खेडकर यांचं प्रकरण समोर आल्यानंतर खेडकर कुटुंबियांनी पूर्वी केलेल्या गुन्ह्यांना आता वाचा फुटली आहे. वर्षभरापूर्वी जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देत शेतकऱ्यांवर पिस्तूल रोखल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पूजा यांचे वडील दिलीप खेडकर, आई मनोरमा यांच्याबरोबर अंबादास खेडकर आणि अनोळखी दोन महीला, दोन पुरुष आणि गुडांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी पूजा यांच्या आईने मुळशी मधील शेतकऱ्याला धमकी देत त्यावर पिस्तूल रोखल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर संबधित शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube