पूजा खेडकरनंतर आता मनोरमा खेडकर पुणे महापालिकेच्या टार्गेटवर; थेट दिली नोटीस

पूजा खेडकरनंतर आता मनोरमा खेडकर पुणे महापालिकेच्या टार्गेटवर; थेट दिली नोटीस

IAS Pooja Khedkar  : सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेल्या आयएएस पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांच्यासोबत त्यांचं अख्य कुटुंब देखील अडचणीत येत आहे.

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांच्याविरोधात पुणे जिल्ह्यातील पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आता बाणेर येथील नॅशनल हाऊसिंग सोसायटीमध्ये असणाऱ्या मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला नोटीस लावण्यात आली आहे. पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) ही नोटीस लावली आहे.

माहितीनुसार, मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याच्या बाहेर असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर अतिक्रमण झालं असून हे अतिक्रमण 7 दिवसात काढून घ्या अन्यथा कारवाई करणार असं  पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीसमध्ये म्हटले आहे.

तर दुसरीकडे आयएएस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मनोरमा खेडकर शेतकऱ्यांना धमकावताना दिसत आहे. या प्रकरणात आता पौड पोलीस स्टेशनंमध्ये शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

माहितीनुसार,  पौड पोलीस स्टेशनंमध्ये शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर यांच्या फिर्यादीनंतर मनोरमा खेडकर यांच्यासह  दिलीप खेडकर, अंबादास खेडकर, चार बाउंसर आणि घटनेवेळी त्यांच्यासोबत आलेल्या इतर गुंड व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा खेडकर यांच्यावर कोणते आरोप?

वादग्रस्त अपगंत्व प्रमाणपत्र देऊन IAS ची पोस्ट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवाय वडिलांची 40 कोटींची संपत्ती असूनही त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

जयंत पाटलांचा शरद पवारांनी बळी घेतला, सदाभाऊ खोतांचा गंभीर आरोप

तब्बल सहावेळा पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचे टाळले. तसेच नुकतीच बदली झालेल्या वाशिमला देखील त्या रूजू झालेल्या नाहीत. खेडकर हे व असे अनेक कारनामे समोर येत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube