लेक एकपट आई पाचपट; मनोरमा खेडकरने बळकावली जमीन, पिस्तूल काढून शेतकऱ्यांना भरला दम
Pooja Khedkar Mother Land Dispute : आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांचे कारनामे गेली एक आठवड्यापासून गाजत आहेत. परंतु, आत्या त्यांची आई त्यांच्यापेक्षा पुढं असल्याचं समोर आलंय. (Pooja Khedkar) पुजा खेडकरच्या आईची अरेरावी आणि तीचा तोरा काही वेगळाच आहे. हाता पिस्तूल घेऊन थेट लोकांना संपण्याची भाषा त्या करततात. पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली. (Land Dispute ) दरम्यान, या जमिनीची वाद न्यायालयात गेला असला तरी पुजा खेडकर यांच्या आईने येथील शेतकऱ्यांना थेट पिस्तूल काढून दम भरला आहे. गंभीर बाब म्हणजे, या शेतकऱ्यांनी याबाबत पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला आहे. वरून दबाव आल्यानं त्यांची साधी तक्रारही नोंदवली गेली नाही.
बारामती कनेक्शन विधान परिषदेसाठी आज मतदान; सर्वांनाच मताच्या वजाबाकीची चिंता, बेरजेच्या गणितात कोण बाजी मारणार?
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांनी बारामती तालुक्यात वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची 14 गुंठे जमीन असल्याचं ट्वीट विजय कुंभार यांनी केलं आहे. वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक 8 मध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर 14 गुंठे जमीन आहे. ही जमीन त्यांनी 2010 ते 2011 च्या दरम्यान खरेदी केली असल्याचं बोललं जातं आहे. दिलीप खेडकर यांची बारामतीतील वाघळवाडी येथे जमीन असल्यानं खेडकर यांचं बारामती कनेक्शन समोर आलं आहे.
मुळशीतली जमिनही बळकावली
पुजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी सरकारी नोकरी करताना कोट्यावधी रुपयांची संपत्ती कमावली आहे. त्यातून त्यांनी अनेक ठिकाणी जमीन खरेदी केली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात खेडकर कुटुंबानं 25 एकर जमीन खरेदी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी ही जमिन खरेदी करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमीनीवर देखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्यांनी जेव्हा या गोष्टीला विरोध केला, तेव्हा पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाऊन्सर घेऊन तिथं पोहचल्या आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावल आहे.
नोटीस पाठवली कोट्यावधींची प्रॉपर्टी तरी नॉन क्रिमिलेअरमधून परीक्षा; IAS पूजा खेडकरा्ंवर थेट केंद्रातून कारवाई होणार
त्यामुळे या खेडकर कुटुंबाला नक्की कोणाचा पाठिंबा आहे, असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान, वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नवनव्या कारनाम्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. खासगी ऑडीवर लाल दिवा वापरल्यानं त्या अडचणीत आल्यात. हे प्रकरण बरंच तापल्यानं अखेर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. पूजा खेडकरच्या ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस पोहोचले. पण बंगल्याचं गेट उघडायला खेडकर कुटुंबीयांनी नकार दिला. एवढंच नाही तर पूजाची आई मनोरमा यांनी पोलिसांनाच दमदाटी केली, एबीपी माझाच्या कॅमेऱ्यावरही त्या धावून आल्या, आणि चित्रिकरण बंद करा असं म्हणत थयथयाट केला. पुणे पोलिसांनी खेडकर यांना वॉट्स अँपवर नोटीस पाठवली आहे.
IAS officer Puja Khedkar's parents, having a non-creamy layer certificate, possess property that includes 110 acres of agricultural land, violating the Agricultural Land Ceiling Act, 6 shops (1.6 lakh sq ft), 7 flats, including one in Hiranandani; 900 grams of gold, diamonds, a… pic.twitter.com/V9u1P5CQ0O
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) July 11, 2024