बायडेन यांनी कहरच केला.. कट्टर शत्रूलाच बनवले मित्र; ‘नाटो’ समिटमध्ये नक्की काय घडलं?
Joe Biden Speech in NATO Summit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून (Joe Biden) पुन्हा एकदा मोठी चूक झाली आहे. नाटो परिषदेत उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी युक्रेनचे (Ukraine) राष्ट्रपती झेलेंस्की यांना राष्ट्रपती पुतिन म्हणून (Vladimir Putin) बसले. 81 वर्षांचे बायडेन यांच्याकडून नेहमीच अशा चुका घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत (President Election) बायडेन स्वतः उमेदवार आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून वारंवार चुका घडत असल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.
बायडेन यांच्याकडून होणाऱ्या या चुकांमुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलित मिळाले आहे. ट्रंप समर्थकांकडून (Donald Trump) त्यांच्यावर खोचक टीका केली जात आहे. वाढत्या वयामुळे आता बायडेन देशाचे नेतृत्व करू शकत नाहीत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. (American President Joe Biden introduced Zelensky as Putin in NATO Summit)
रणनीती की स्वातंत्र्य.. ‘नाटो’ला नकाराचा भारताचा अजेंडा काय?, वाचा इंट्रेस्टिंग फॅक्टस्
मागील आठवड्यात एका रेडिओ मुलाखतीत सुद्धा त्यांनी असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर नाटो समिटमध्येही त्यांनी (NATO Summit) नावात गडबड केल्याने फजिती झाली. या समिट मध्ये त्यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेंस्की यांना राष्ट्रपती पुतिन असे संबोधून व्यासपीठावर बोलावले. यावेळी झेलेंस्की त्यांच्या बाजूलाच उभे होते. पण काही क्षणातच बायडेन यांच्या लक्षात आले आणि त्यांनी आपली चूक दुरुस्त केली. नंतर झेलेंस्की यांनीही मिश्किल टिप्पणी करत आपण पुतिन यांच्यापेक्षा सरस असल्याचे सांगत वेळ मारुन नेली.
यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना याबाबत विचारले तेव्हा बायडेन यांनी सारवासारव केली. त्यावेळी मी व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल बोलत होतो आणि अनवधानाने माझ्याकडून तसे शब्द उच्चारले गेले असे बायडेन म्हणाले. यानंतर याच पत्रकार परिषदेत बायडेन यांनी पुन्हा मोठी चूक केली. एका पत्रकाराने त्यांना विचारले की तुमच्या जागी कमला हॅरिस (Kamala Harris) अमेरिकेचे नेतृत्व चांगल्या पद्धतीने करतील असे वाटत नाही. त्यावर बायडेन म्हणाले, मला असं वाटत नाही की उपराष्ट्रपती ट्रम्प राष्ट्रपती बनण्यासाठी योग्य नाहीत. तर मी त्यांना उपराष्ट्रपती पदासाठी कधीच निवडलं नसतं. म्हणजेच बोलण्याच्या ओघात त्यांनी कमला हॅरिस ऐवजी ट्रम्प यांनाच उपराष्ट्रपती करून टाकलं.
Donald Trump : ठरलं तर! राष्ट्राध्यक्षपदासाठी पुन्हा ट्रम्प-बायडेन टक्कर; ‘या’ उमेदवाराची माघार