Donald Trump : ठरलं तर! राष्ट्राध्यक्षपदासाठी पुन्हा ट्रम्प-बायडेन टक्कर; ‘या’ उमेदवाराची माघार
Donald Trump : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. मात्र त्याआधीच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांची उमेदवारी पक्की केली आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्य शर्यतीतून भारतीय वंशाच्या निक्की हेली (Nikki Haley) आता बाहेर पडल्या आहेत. त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतल्याचा दावा वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. अमेरिकेतील प्राथमिक निवडणुकीत 15 पैकी फक्त एकाच निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. निक्की हॅले यांच्या या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची उमेदवारी मात्र पक्की झाली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन (Joe Biden) असाच सामना होणार असल्याचे आताच निश्चित झाले आहे.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पना धक्का! अध्यक्षपदाची निवडणूकच लढता येणार नाही; कारण काय?
अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळण्यासाठी प्राथमिक निवडणूक झाली. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर होते. विवेक रामास्वामी यांच्यासह अन्य काही नेत्यांनी माघार घेत ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला होता. परंतु, निक्की हॅले मात्र त्यांना टक्कर देत होत्या. ट्रम्प यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपद गेल्यास देशात अराजकता निर्माण होईल असा आरोप त्यांच्याकडून सातत्याने केला जात होता.
परंतु, मतदानात मात्र त्या पिछाडीवर राहिल्या. कॅरोलिना या त्यांच्या गृहराज्यातही पराभव झाला. तरी देखील हॅले यांनी माघार घेतली नव्हती. वॉशिंग्टन डिसीमध्ये मात्र त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर मात्र बुधवारी झालेल्या 15 प्रायमरींपैकी 14 ठिकाणी पराभव झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर निक्की हॅले यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्यावर 2020 च्या जर्जियाच्या निवडणुकीत निकाल बदलण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने ट्रम्प यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता ट्रम्प चांगलेच अडचणीत सापडले होते. जॉर्जियातील फुल्टन काउंटी जिल्हा वकील फॅनी विलिस यांनी याबाबत माहिती दिली होती. ट्रम्प सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहेत.
अमेरिकेतील न्यायालयानं ट्रम्प यांना 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी अपात्र ठरवलं होतं. ट्रम्प यांना न्यायालयाने राष्ट्रपती पदासाठीच्या राज्याच्या प्राथमिक मतदान यादीतून काढून टाकण्यात आलं होतं. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत अध्यक्षीय पदासाठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत आता डोनाल्ड ट्रम्प यांना सहभागी होता येणार नाही, असंही न्यायालयानं म्हटलं होतं.