Donald Trump : ट्रम्पना पुन्हा धक्का! कोलोरॅडोनंतर आणखी एका राज्याकडून निवडणूक बंदी
Donald Trump : कोलोरॅडो येथील न्यायालयाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अपात्र घोषित करण्याचा निर्णय ताजा असतानाच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना आणखी एक दणका बसला आहे. कोलोरॅडोनंतर आणखी एका राज्याने ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुकीपासून रोखले आहे. अमेरिकेतील मेन या राज्याने ट्रम्प यांच्याबाबतीत हा आदेश दिला. मेन राज्याचे सेक्रेटरी ऑफ स्टेट शेना ली बेलोज यांनी 2021 मधील कॅपिटल हिल दंगलीत टॅम्प यांच्या भुमिकेमुळे संवैधानिक बंड या तरतुदीचा हवाला देत ट्रम्प यांना पुढील वर्षात होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून रोखले. या निवडणुकीत ट्रम्प उभे राहू शकत नाही असा निर्णय शेना ली बेलोज यांनी दिला. या निर्णयामुळे ट्रम्प आता रिपब्लीकन पक्षाचे उमेदवार होण्यासाठी मेन राज्यात होणाऱ्या निवडणुकीतही सहभागी होऊ शकत नाहीत.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पना धक्का! अध्यक्षपदाची निवडणूकच लढता येणार नाही; कारण काय?
दरम्यान, ट्रम्प यांच्यावर 2020 च्या जर्जियाच्या निवडणुकीत निकाल बदलण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने ट्रम्प यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता ट्रम्प चांगलेच अडचणीत सापडले होते. जॉर्जियातील फुल्टन काउंटी जिल्हा वकील फॅनी विलिस यांनी याबाबत माहिती दिली होती. ट्रम्प सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहेत.
ट्रम्प यांना या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्याची संधी राहणार आहे. मिनेसोटा आणि मिशिगन न्यायालयांनी मात्र ट्रम्प यांच्याविरोधातील अशाच प्रकारच्या याचिका फेटाळल्या आहेत. मात्र कोलोरॅडो सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांच्याविरोधात निकाल देत त्यांना अपात्र घोषित केले होते. त्यानंतर पुन्हा एका राज्याने असाच निर्णय दिला आहे. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.