Ukraine War : युक्रेन युद्धात तेल! रशियाच्या कट्टर शत्रूच्या हाती ‘नाटो’ची कमान
Ukraine Russia War : जगातील सर्वाधिक शक्तिशाली सैन्य संघटना नाटो संदर्भात (NATO) महत्वाची बातमी आली आहे. या संघटनेच्या महासचिवपदी नेदरलँड्सचे माजी पंतप्रधान मार्क रुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर २०२४ या दिवशी रूटे या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध (Ukraine Russia War) सुरू असतानाच नाटोने हा मोठा निर्णय घेतला आहे. मार्क रूटे नाटोचे सध्याचे महासचिव जेम्स स्टोलटेनबर्ग यांच्याकडून कार्यभार स्वीकारतील. स्टोलटेनबर्ग मागील दहा वर्षांपासून महासचिव आहेत. रशिया युक्रेन युद्धामुळे (Ukraine War) मध्यंतरी त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
मार्क रूटे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे (Vladimir Putin) कट्टर टीकाकार आहेत. युक्रेनला मदत (Ukraine) करण्यातही त्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे रुटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना या युद्धात सहकाऱ्यांचा पाठिंबा टिकवून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. तसेच रशिया विरोधात (Russia) थेट युद्धात उतरण्यापासूनही नाटोला रोखावे लागणार आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडीमिर झेलेंस्की यांनी मार्क रुटे (Netherlands) यांच्या कार्य पद्धतीचं कौतुक केलं आहे. रूटे एक सिद्धांतवादी आणि मजबूत नेते आहेत. मागील काही वर्षांत त्यांनी अनेक वेळा त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिचय दिला आहे असे झेलेंस्की म्हणाले. संघटनेच्या महासचिवपदी रूटे यांची नियुक्ती केल्यानंतर रशियानेही प्रतिक्रिया दिली आहे. रूटे यांच्या नियुक्तीने परिस्थितीत काहीच बदल होणार नाही असा इशारा रशियाने दिला आहे.
या निवडीनंतर रूटे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. नाटोच्या महासचिवपदी संधी मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ही संघटना आपल्या सामूहिक सुरक्षेचा आधार आहे आणि राहील. या संघटनेचा नेतृत्व करणं ही अशी जबाबदारी आहे ज्याला मी कधीच हलक्यात घेणार नाही. माझ्यावर हा विश्वास दाखवल्याबद्दल मी सर्व सहकाऱ्यांचा आभारी आहे असे रुटे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Russia China : चीन-रशियाकडून ‘डॉलर’ हद्दपार! द्विपक्षीय व्यापारासाठी तयार केला खास प्लॅन
पाश्चिमात्य देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध टाकल्यानंतर सुद्धा रशियाच्या अर्थव्यवस्थेने 3.6 टक्के दराने वाढ नोंदवली आहे. तर 2024 या वर्षात 2.6 टक्के दराने अर्थव्यवस्था वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाश्चिमात्य देशांकडून टाकल्या जात असलेल्या निर्बंधांचा सामना करण्याची तयारी रशियाने 2013 पासूनच सुरु केली होती. अशातच ज्यावेळी युरोपने आर्थिक निर्बंधांची घोषणा केली त्यावेळी रुबल करेंसीला घसरणीपासून वाचविण्यासाठी रशियाने सोन्याच्या किमती निश्चित करून टाकल्या. या निर्णयामुळे रशियाच्या चलनातील घसरण थांबली.