पाकिस्तानात दहशतवादी हल्ला, लष्कराची बसच उडवली; 12 सैनिकांचा मृत्यू, 4 गंभीर

दक्षिण वजीरिस्तान भागात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीवर हल्ला झाला.

Pakistan News

Pakistan News : पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील दक्षिण वजीरिस्तान भागात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीवर हल्ला झाला यात 12 सैनिकांचा मृ्त्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. जखमी सैनिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक सुरक्षा दलांच्या मते हा हल्ला अतिशय सुनियोजित पद्धतीने करण्यात आला. हल्ला इतका अनपेक्षित होता की सैन्याला कोणतीही प्रतिक्रिया देता आली नाही.

Breaking! पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या संघटनेने हल्ल्याची (Pakistan News) जबाबदारी घेतली आहे. आमच्या लोकांनी सैनिकांकडून (Pakistan Army) हत्यारे हिसकावून घेतली. यानंतर आता सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने शोधमोहिम सुरू केली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचालींची तत्काळ माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

पाकिस्तानी सैन्यावरील मोठा हल्ला

खैबर पख्तूनख्वा प्रांतात अलीकडच्या काळात झालेल्या हल्ल्यातील हा एक मोठा हल्ला होता. या भागावर टीटीपीचे नियंत्रण होते. परंतु, 2014 मधील एका सैन्य मोहिमेनंतर त्यांना मागे हटावे लागले. 2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात दहशतवादी घटना वाढल्या आहेत. टीटीपी आणि अफगाण तालिबानचे संबंधही चांगले आहेत. अफगाणिस्तानातून पाकिस्तानात हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना नियंत्रणात आणण्यात अफगाणिस्तान सरकार अपयशी ठरल्याचा दावा पाकिस्तान करत असतो. परंतु, अफगाणिस्तानकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे.

चीन-पाकिस्तान संबंधात दुरावा! मोठ्या विकास प्रकल्पातून ‘ड्रॅगन’ची अचानक माघार, पाकिस्तानच्या आव्हानांत वाढ

एएफपी वृत्तसंस्थेनुसार, 1 जानेवारीपासून खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतातील हल्ल्यांत आतापर्यंत 460 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सुरक्षा दलातील जवानांचा समावेश आहे. सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीजच्या रिपोर्टनुसार मागील वर्षात पाकिस्तानने जवळपास दहा वर्षांतील सर्वाधिक कठीण काळाचा सामना केला आहे. या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत 1600 लोकांचा मृत्यू झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube