चीन-पाकिस्तान संबंधात दुरावा! मोठ्या विकास प्रकल्पातून ‘ड्रॅगन’ची अचानक माघार, पाकिस्तानच्या आव्हानांत वाढ

China-Pakistan relations strained : पाकिस्तानचा चीन हा सर्वात चांगला मित्र समजला जातो. परंतू अलिकडच्या काही घटनांमुळे या संबंधात काहीतरी बिनसल्याचे सांगितलं जातं आहे. त्यातच आता पाकिस्तानच्या एका नव्या निर्णयामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. पाकिस्तानने देशातील जुन्या रेल्वे नेटवर्कच्या विकास कामांसाठी चीनऐवजी आता आशियाई विकास बँकेची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
‘कराची-रोहरी’ रेल्वे विभाग सुधारण्यासाठी पाकिस्तानने (Pakistan) आशियाई विकास बँकेकडून $2 अब्ज डॉलर्स कर्ज मागितले आहे. हा तोच ML-1 प्रकल्प आहे, जो एकेकाळी ‘चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर’ (CPEC) चा सर्वात मोठा आणि सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जात होता. त्यामुळे चीन (China) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) संबंध बिघडल्याची सर्वत्र चर्चा आहे.
कंत्राटी कामगाराची विष पिऊन आत्महत्या; सावकारांच्या तगाद्याला कंटाळून संपवलं जीवन
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट
आता चीनने (China) या प्रकल्पातून माघार घेतल्याने पाकिस्तानच्या (Pakistan) आर्थिक परिस्थितीबाबतच्या चिंता आणखी अधोरेखित होत आहे. चीनने पाकिस्तानच्या प्रकल्पातून माघार का घेतली याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, चीनने हा निर्णय अचानक घेतलेला नाही. पाकिस्तानची (Pakistan) कमकुवत आर्थिक परिस्थिती आणि कर्ज फेडण्यात येणाऱ्या अडचणी चीनसाठी समस्या ठरत असल्याची शक्यता सांगितली जाते आहे.
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : समुद्रात मोठी भरती, लालबागच्या राजाचे विसर्जन रखडले
चीनने आधीच पाकिस्तानमध्ये (Pakistan) अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. याच गुंतवणूकीतून चीनला पैसे परत मिळविण्यात समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच अर्थव्यवस्थेवरील दबाव पाहता चीन (China) अधिक धोकादायक गुंतवणुकीपासून माघार घेताना दिसतो आहे. यावरून असे दिसून येतं की, जेव्हा आर्थिक परिस्थिती धोक्यात असते तेव्हा चांगले मित्रही मागे हटू शकतात.
चीन, अमेरिका आणि आशियाई विकास बँक (ADB)
आशियाई विकास बँकेची (ADB) वाढलेली भूमिका दाखवते की, पाकिस्तान आता फक्त चीनवर (China) अवलंबून राहू इच्छित नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंध बिघडू नयेत म्हणून पाकिस्तानने या निर्णयापूर्वी चीनकडून संमती घेतली होती. पाकिस्तानचे (Pakistan) लष्करप्रमुख असीम मुनीर म्हणाले, “आम्ही एका मित्रासाठी दुसऱ्या मित्राचा त्याग करणार नाही.” दरम्यान अमेरिका देखील पाकिस्तानच्या रेको डिकमध्ये रस दाखवत आहे.
धक्कादायक! लाल किल्ल्यात एक कोटींच्या कलशाची चोरी, जैन साधूच्या वेशात आला अन्…
यावरून असे दिसून येतं की, पाकिस्तान (Pakistan) आता बहुआयामी परराष्ट्र धोरणाकडे वाटचाल करत आहे, ज्यामध्ये चीन (China) , अमेरिका आणि बहुपक्षीय संस्था (एडीबी, आयएमएफ) यांचा समावेश असेल. अलिकडच्या काळात, पाकिस्तान आणि अमेरिकेतील संबंध चांगले होत असल्याचे दिसून येत आहे, कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानी तेल साठ्याची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे.