कंत्राटी कामगाराची विष पिऊन आत्महत्या; सावकारांच्या तगाद्याला कंटाळून संपवलं जीवन

Nashik Suicide

Nashik suicide by worker: अवैध सावकारांच्या तगाद्याला कंटाळून एका कंत्राटी कामगाराने विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. नाशिकमधील ध्रुवनगर परिसरातील ही घटना आहे. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणात मृत व्यक्तीने लिहिलेल्या सुसाइड नोटच्या आधारे तपास केला. तपासानंतर तिघा खासगी सावकारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत, दोघांना अटक करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे नाव राजेंद्र भगवान सूर्यवंशी (वय 39) असे आहे.

धक्कादायक! लाल किल्ल्यात एक कोटींच्या कलशाची चोरी, जैन साधूच्या वेशात आला अन्…

नाशिकमध्ये (Nashik) अवैध सावकारांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून राजेंद्र सूर्यवंशी यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या (Suicide) केली. विष घेतल्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान राजेंद्र यांच्या खिशात एक सुसाइड नोट (Suicide) सापडली. यामध्ये काही सावकारांची नावे नमूद करण्यात आली होती. या खासगी सावकारांमुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

Soaked Raisins Benefits : महिलांनो, दररोज खा भिजवलेले मनुके, फायदे जाणून व्हाल थक्क

मानसिक दबाव टाकत वसुलीसाठी तगादा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र सूर्यवंशी हे सातपूर (Nashik) एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. 2021 ते 2022 कालावधीत त्यांनी घरखर्च आणि इतर गरजांसाठी खासगी सावकारांकडून एकूण 7.70 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यामध्ये 6 टक्के व्याजदराने 4.70 लाख आणि 4 टक्के दराने 3 लाख रुपये घेतले गेले होते. राजेंद्र यांनी या रकमेतील काही रक्कमेची परतफेडही केली होती. मात्र, संपूर्ण कर्जाची परतफेड न झाल्याने संशयित सावकारांनी त्यांनी सातत्याने त्रास (Suicide) देण्यास सुरुवात केली. पैशाची मागणी करताना या सावकरांनी राजेंद्र यांच्यावर मानसिक दबाव टाकत वसुलीसाठी तगादा लावला.

सकाळ आरोग्यदायी तर दिवस उत्साही! जाणून घ्या सकाळच्या नाश्त्याचे आरोग्यदायी पर्याय

घर नावावर करण्याचा दबाव

या प्रकरणात श्यामराव पाटील उर्फ गिरणारकर, मोहन खोडे आणि नंदू बच्छाव यांच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात (Nashik) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील गिरणारकर आणि खोडे यांना अटक (Suicide) करण्यात आली असून, त्यांना 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिसरा संशयित नंदू बच्छाव अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. राजेंद्र यांचे घर (Nashik) गिरणारकर आणि खोडे या दोघांनी कर्ज फेडल्याशिवाय आपल्या नावावर करून घेण्यासाठी दबाव टाकला होता. त्यांनी घराची कागदपत्रे नोटरी करून घेतल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.

100 कोटींचा प्रकल्प! सिद्धिविनायक मंदिराचा विस्तार, नव्या सुविधा तयार होणार

नाशिकच्या ध्रुवनगर परिसरात (Nashik) या घटनेमुळे (Suicide) हळहळ व्यक्त केली जात आहे. अवैध सावकारांच्या मनमानी वसुली पद्धतीमुळे सामान्य नागरिकांचे जीवन संकटात आले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी परिसरातील (Nashik) नागरिकांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube