सकाळ आरोग्यदायी तर दिवस उत्साही! जाणून घ्या सकाळच्या नाश्त्याचे आरोग्यदायी पर्याय

Common breakfast tips for morning : असं म्हटलं जातं की, जर सकाळ चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. हे अगदी बरोबर आहे. कारण जर सकाळची सुरुवात चुकीची झाली तर दिवस चांगला जात नाही. विशेषतः जर नाश्ता योग्य प्रकारे केला नाही तर दिवसभर शरीरात उर्जेचा अभाव जाणवत राहतो. ज्यामुळे कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. तसेच आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात.
आजकाल लोक बऱ्याचदा सकाळी घाईत असतात. म्हणूनच घाईघाईत जे काही मिळेल तेच सकाळी खाल्लं जातं. अशा पद्धतीने खाण्याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
100 कोटींचा प्रकल्प! सिद्धिविनायक मंदिराचा विस्तार, नव्या सुविधा तयार होणार
तज्ञांच्या मते, काही सामान्य नाश्त्याचे (Breakfast Tips) पदार्थ रिकाम्या पोटी खाऊ नयेत. तसेच, काही पदार्थ असे आहेत जे शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी आहेत. चला तर मग जाणून घेऊया सकाळी नाश्त्यात काय काय खाल्ले पाहिजे…
Inspector Zende : वडिलांच्या कथांपासून ते पडद्यावर: ओम राऊतचे इन्स्पेक्टर झेंडेशी खास नाते
तज्ञ काय सांगतात?
हेल्थलाइनच्या मते, जेव्हा तुम्ही सकाळी आरोग्यदायी नाश्ता करता तेव्हा हा नाश्ता तुम्हाला दिवसभराची उर्जा (Breakfast Tips) प्रदान करतो. शिवाय तुमचे पोटही बराच काळ भरलेले राहते. चांगला नाश्ता सहसा फायबर, प्रथिने, निरोगी चरबी आणि आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध असतो. त्याच वेळी, बाजारात उपलब्ध असलेले काही नाश्त्याचे पदार्थ असे असतात यामध्ये भरपूर साखर, रिफाइंड कार्ब्स आणि प्रिझर्वेटिव्ह्ज असतात, जे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत. अशा परिस्थितीत, आपण आपल्या सकाळच्या दिनचर्येत काही पौष्टिक आणि नैसर्गिक गोष्टी (Breakfast Tips) का समाविष्ट करू नये?
कोणी दिल्या कोट्यवधींच्या ‘देवाभाऊ’ जाहिराती? रोहित पवारांनी उकललं गूढ, मंत्रीच जबाबदार पण…
आरोग्यदायी नाश्ता
नाश्त्यात अंड्यांचा समावेश (Breakfast Tips) असावा. जे मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी नाश्त्यात अंडी खाणे खूप आरोग्यदायी आहे. अंडी प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे, जे पोट बराच काळ भरलेले ठेवते आणि स्नायूंना बळकट बनवण्यास मदत करतात. ग्रीक योगर्ट हा देखील एक चांगला पर्याय आहे. ग्रीक योगर्ट मध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात. काही ग्रीक दह्यांमध्ये बायफिडोबॅक्टेरियासारखे प्रोबायोटिक्स देखील असतात, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. होल ग्रेन टोस्टचा देखील नाश्त्यात समावेश (Breakfast Tips) केला जाऊ शकतो. होल ग्रेन टोस्टमध्ये फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स भरपूर असतात. हे टोस्ट रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात.