उन्हाळ्यात अंडी खाणे धोकादायक? तज्ज्ञ काय सांगतात…

Health Tips Eating Eggs In Summer Can Be Harmful : उन्हाळा येताच आणि पंखे आणि कूलर चालू होतात. यासोबतच लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलू लागतात. या ऋतूमध्ये थंड पदार्थांना प्राधान्य दिले जाते अन् काही गोष्टी उष्ण स्वरूपाच्या असल्याने टाळल्या (Health Tips) जातात. या ऋतूत बरेच लोक अंडी खाण्यापासून दूर राहतात. उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, असं सांगितलं जातं. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात अंडी (Eggs) खाणं टाळतात. पण काय खरंच उन्हाळ्यात अंडी खाणे आरोग्यासाठ हानिकारक आहे? हे आपण जाणून घेऊ या.
अंडी खाण्याचे फायदे
1. अंड्यांमध्ये उच्च दर्जाचे प्रथिने असतात, ते शरीराच्या वाढीसाठी आणि स्नायूंच्या वाढीसाठी आवश्यक असते.
2. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, फॉलिक अॅसिड आणि सेलेनियम सारखे आवश्यक पोषक घटक असतात, ते शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात.
3. अंड्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात, ते डोळ्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारतात.
4. अंडी खाल्ल्याने पोट लवकर भरते, ज्यामुळे जास्त खाणे टाळता येते, ते वजन कमी करण्यास मदत करू शकते.
5. अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉल असते, परंतु संशोधनातून असे दिसून आले आहे की, ते बहुतेक लोकांना हृदयरोगाचे कारण बनत नाही. ते मर्यादित प्रमाणात खाणे सुरक्षित आहे.
6. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते.
7. अंड्यामध्ये कोलीन नावाचा घटक असतो, तो मेंदू सुधारतो आणि स्मरणशक्ती वाढवतो.
Video : जन्मांध मालाचा काळाकुट्ट प्रवास ते MPSC तील ‘नेत्रदीपक’ यश; प्रत्येकाने वाचावा असाच प्रवास
अंडी खाल्ल्याने उष्णता वाढते?
तज्ज्ञ सांगतात की, अंडी हे उष्ण अन्न आहे. हे खाल्ल्यानंतर शरीरात थोडी उष्णता जाणवू शकते. पण याचा अर्थ असा नाही की, उन्हाळ्यात अंडी खाणे हानिकारक आहे. अंडी हे प्रथिने, व्हिटॅमिन बी 12, लोह आणि निरोगी चरबीचा उत्कृष्ट स्रोत आहे. जर तुम्ही ते मर्यादित प्रमाणात खाल्ले, तर उन्हाळ्यातही ते फायदेशीर ठरते.
उद्धव ठाकरेंच्या मनात राज ठाकरेंविषयी कोणताही.. एकत्र येण्याबाबत राऊतांनी दिली आतली बातमी
उन्हाळ्यात अंडी कशी खावीत?
उकडलेले किंवा मऊ उकडलेले अंडे खा, तेलकट ऑम्लेट किंवा अंडी करी टाळा.
दिवसाच्या थंड वेळी खा, जसे की नाश्ता, दुपारच्या कडक उन्हात नाही.
शरीराचे तापमान संतुलित राहावे म्हणून भरपूर पाणी प्या.
अंडी लवकर खराब होऊ नयेत म्हणून ती रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
उन्हाळ्यात अंडी कोणी खाऊ नयेत?
1. ज्या लोकांना वारंवार उष्णता जाणवते किंवा शरीरात पित्त समस्या असतात.
2. डिहायड्रेशन किंवा अॅसिडिटीची समस्या आहे.
3. मुलांना आणि वृद्धांना मर्यादित प्रमाणातच द्यावे.