Video : जन्मांध मालाचा काळाकुट्ट प्रवास ते MPSC तील ‘नेत्रदीपक’ यश; प्रत्येकाने वाचावा असाच प्रवास

Blind Mala Shankar Baba Papalkar Success Cracked MPSC Exam : एका नवजात बाळाची कल्पना करा, ज्याचा जन्म होताच नशिबाने कचऱ्याच्या अंध:कारात ढकलले. जळगाव (Jalgaon) रेल्वे स्टेशनचा तो कोपरा, जिथे तिच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. ही कहाणी आहे, माला पापळकरची (Mala Papalkar). अनाथ, जन्मांध मालाचा जीवन प्रवास काळ्याकुट्ट अडचणींनी भरलेला होता. 25 वर्षांपूर्वी जेव्हा नशिबाने तिला असहाय्य सोडले, तेव्हा क्वचितच कोणी विचार केला असेल की, एके दिवशी ही मुलगी तिच्या कठोर परिश्रमाने स्वतःची ओळख (MPSC Exam) निर्माण करेल, हजारो लोकांसाठी प्रेरणास्थानही बनेल.
जळगाव रेल्वे स्थानकावरील कचऱ्याच्या डब्यातून 25 वर्षांपूर्वी वाचविण्यात आलेली अंध माला पापळकर हिने एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षा उत्तीर्ण केली (Success Story) आहे. आता ती नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. आपण तिच्या संघर्षाची कहाणी जाणून घेऊ या…
उद्धव ठाकरेंच्या मनात राज ठाकरेंविषयी कोणताही.. एकत्र येण्याबाबत राऊतांनी दिली आतली बातमी
पोलिसांना 25 वर्षांपूर्वी माला जळगाव रेल्वे स्थानकावर एका कचऱ्याच्या डब्यात सापडली होती. सुरूवातीला तिला जळगाव येथील बाल सुधारगृहात ठेवलं गेलं. पण नियतीने तिच्या नशिबात काहितरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. मालाला बाल सुधारगृहातून अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तहसीलमधील शंकरबाबा पापळकर यांच्या वज्र आश्रमात पाठवण्यात आलं. पद्म पुरस्कार विजेते शंकरबाबा हे अंध आणि बहिरे लोकांसाठी एक प्रमुख पुनर्वसन केंद्र चालवतात. 81 वर्षीय शंकरबाबांनी मालाला केवळ त्यांचं नावच दिले नाही, तर तिच्या प्रतिभेची ओळख करून दिली. त्यांनी मालाला ब्रेल लिपीत शिक्षण दिलं.
माला गेल्या वर्षी मे महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) क्लर्क-कम-टंकलेखक (ग्रुप क) परीक्षेत उत्तीर्ण झाली. त्यानंतर आता तिला महसूल सहाय्यक पदासाठी नियुक्ती पत्र मिळालंय. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, ती पुढील 8-10 दिवसांत नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात काम सुरू करू शकते.
एकेकाळी तिच्या आईवडिलांपासून वेगळी झालेली अन् शंकरबाबा पापळकरांच्या आश्रमात वाढलेल्या मालाने कधीही तिच्या दिव्यांगत्वाला तिच्या संघर्षाच अडथळा बनू दिले नाही. ब्रेल लिपीत शिक्षण घेऊन आणि आपल्या अपवादात्मक स्मरणशक्तीचा वापर करून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने एमपीएससी परीक्षेची तयारी केली. कोचिंग, ऑडिओ कॅसेट्स आणि ऑनलाइन सपोर्टच्या मार्गदर्शनाने त्याने हे यश मिळवले. मालाचे यश स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांसोबत, मालाचीही महसूल सहाय्यक म्हणून निवड झाली आहे.
यावर माला पापळकर म्हणते की, मी लहान असताना पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांच्याकडे आलो. माझे आई-वडिल कुठे आहेत, हे मला माहित नाही. मी जेव्हा बाबांकडे आले, तेव्हा मी खूपच लहान होते. शंकर बाबांनी मला त्यांचे नाव देवून आई-वडिलांचं आसरा दिला. त्यांनी मला शिकवलं, मोठं केलं अन् या यशापर्यंत पोहोचवलं. मला कधीच वाटले नव्हते की, मी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकेन. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मी खूप आनंदी आहे. मी दररोज 6 ते 7 तास अभ्यास करायचे, असं देखील माला सांगते.
https://twitter.com/ANI/status/1914551794920735030