एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर! सोलापूरचा विजय लमकणे राज्यात प्रथम, हिमालय घोरपडेने पटकावला दुसरा क्रमांक
MPSC results announced झाला त्यामध्ये सोलापूरातील विजय नागनाथ लमकणे हा राज्यात प्रथम तर हिमालय घोरपडे दुसरा आला आहे.
 
          MPSC results announced! Solapur’s Vijay Lamkane secured first position in state, Himalaya Ghorpade secured second : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएसीकडून राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल गुरूवारी 30 ऑक्टोबरला रात्री उशिरा जाहीर झाला. यानंतर राज्यातील अनेकांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार झाले आहे. त्यामध्ये सोलापूरातील विजय नागनाथ लमकणे हा राज्यात प्रथम आला आहे.
30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर; सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून जरांगेंचा हल्लाबोल
या परिक्षेत लमकनेनंतर हिमालय घोरपडे याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर नागपूरची प्रगती जगताप ही अनुसूचित जाती प्रवर्गातीन पहिली आली आहे. या निकालामध्ये एमपीएससीकडून सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि पात्रता गुण जाहीर करण्यात आले आहेत. ही परीक्षा 27 ते 29 मे 2024 दरम्यान घेण्यात आली होती. या परिक्षेमध्ये पात्र ठरलेल्या 1516 उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया 30 ऑक्टोबरपर्यंत पार पडली. त्यानंतर आयोगाकडून रात्री उशीरा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये 7970 उमेदवार पात्र ठरले होते. त्यातील 7732 उमेदवारांनीच मुख्य परिक्षेसाठी अर्ज सादर केला होता. कारण या प्रक्रियेमध्ये अनेकांना तांत्रिक अडचणी आल्या होत्या.
पूर्व परीक्षेनंतर लगेच जारी होणार उत्तर पत्रिका; यूपीएससीचा मोठा निर्णय
नागरी सेवा प्राथमिक परीक्षेची (CSE Prelims) प्रोव्हिजनल आन्सर की आता परीक्षेनंतर लगेचच जाहीर केल्या जाणार असल्याचा मोठा निर्णय यूपीएसीने घेतला आहे, अशी माहिती आयोगाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. पारदर्शकता वाढविण्याच्या मागणीसाठी एका याचिकेला उत्तर देताना आयोगाने न्यायालयाला ही माहिती दिली आहे. नागरी सेवा परीक्षेची तयारी करणारे लाखो उमेदवार बऱ्याच काळापासून ही मागणी करत होते. UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या उमेदवारांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांवर आक्षेप घेण्याची संधी देखील मिळेल. तथापि, परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच अंतिम उत्तरपत्रिका जाहीर केली जाणार आहे.


 
                            





 
		


 
                         
                        