राज ठाकरेंचा विवेकानंद पाटीलला फोन म्हणाले, MPSC च्या लढ्याला यश मिळालं आता…
Raj Thackeray Vivekananda Patil विवेकानंद पाटील घरी आला. तेव्हा त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा देखील फोन आल्याचं सांगितलं.
Raj Thackeray Phone called Vivekananda Patil after MPSC struggle has succeeded : एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांकडून गेल्या काही दिवस आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा चेहरा बनलेल्या विवेकानंद पाटील यांनी त्यांच्या भाषणांतून हे आंदोलन गाजवले. तसेच त्याने कधी सरकारवर हल्ला केला तर कधी शालजोडे लागवाले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले त्यानंतर तो त्याच्या कोल्हापूरच्या घरी आला. त्यावेळी गावकऱ्यांकडून त्याचं जंगी स्वागत झालं.
Sourav Das : ‘पीस बॉन्ड’ म्हणजे काय? उल्लंघन केल्याने CJP नेत्यांना अटक
विवेकानंद पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील माजगाव या गावाचे राहिवासी आहेत. त्यात एमपीएससी आंदोलनामध्ये सरकारच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले त्यानंतर तो त्याच्या कोल्हापूरच्या घरी आला. त्यावेळी गावकऱ्यांकडून त्याचं जंगी स्वागत झालं. यावेळी त्याने पुन्हा एकदा गावकऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा त्याने आंदोलनातील आपले अनुभव सांगितले. यमध्ये त्याने आपल्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा देखील फोन आल्याचं सांगितलं.
फडणवीसांची मोठी घोषणा! दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार जमा होणार
विवेकानंद पाटीललने राज ठाकरे त्याला नेमकं काय म्हणाले हे सांगितलं तो म्हणाला की, एमपीएससी आंदोलनादरम्यान केलेल्या भाषणामुळे अनेकांनी माझे कौतुक केले, दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही आपल्याला फोन आल्याचे विवेकानंद पाटील यांनी सांगितले. “तुमच्या लढ्याला यश मिळाले आहे. आता मुंबईला या आणि भेटून जा,” असे राज ठाकरे यांनी सांगितल्याचे पाटील यांनी नमूद केले. त्यामुळे आपण पुन्हा मुंबईला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे पुन्हा एकत्र; ‘आई भाड्याने हवी?’ च्या चित्रीकरणाला सुरुवात
एमपीएससीच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. या भेटीनंतर पुढील दोन दिवसांत चांगली बातमी मिळेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर दोन दिवसांच्या आत सरकारने एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना रजेवर पाठवले. त्यामुळे या घडामोडींकडे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून पाहिले जात आहे.