विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी विराट अन् रोहितवर दबाव?, काय दिलं BCCI ने स्पष्टीकरण?
या वर्षी जानेवारीमध्ये दोन्ही अनुभवी खेळाडूंनी दिल्ली आणि मुंबईसाठी प्रत्येकी एक रणजी ट्रॉफी सामना खेळला होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताच्या (India) विजयाचे नायक होते, ज्यांनी धावांचा वर्षाव केला. या जोडीने स्थानिक एकदिवसीय स्पर्धा, विजय हजारे ट्रॉफी 2025 मध्ये खेळतील की नाही यावरुन अनेक चर्चा झाल्या. दोन्ही वरिष्ठ क्रिकेटपटूंवर ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी दबाव आणण्यात आला होता, असे आरोप केले जात आहेत. दरम्यान, BCCI ने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
रेव्हस्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दबावाच्या आरोपांना नकार दिला आणि सांगितलं, की ते आधीच ठरलेले होते. त्यांनी स्वतः हा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात विराट कोहलीने दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला फोन करून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी उपलब्धतेची घोषणा केली. डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी याची पुष्टी केली. दरम्यान, रोहित शर्माने मुंबई क्रिकेट असोसिएशनला 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्याची माहिती दिली आहे.
मोठी बातमी, स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न मोडलं, स्मृतीने केला धक्कादायक खुलासा
या वर्षी जानेवारीमध्ये दोन्ही अनुभवी खेळाडूंनी दिल्ली आणि मुंबईसाठी प्रत्येकी एक रणजी ट्रॉफी सामना खेळला होता. नंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे काही काळापासून टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी मतभेद आहेत. हा संघर्ष अनेक वेळा समोर आला आहे आणि दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे कारण असल्याचे मानले जाते. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत प्रभावी कामगिरी करूनही, गंभीरने त्यांना 2027 च्या विश्वचषकासाठी दावेदार मानले नाही.
ते जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत आणि ड्रेसिंग रूममधील त्यांचा अनुभव महत्त्वाचा आहे. ते बऱ्याच काळापासून संघाला विजय मिळवून देण्यासाठी हे करत आहेत. आशा आहे की, ते असेच करत राहतील, जे 50 षटकांच्या स्वरूपात संघासाठी महत्त्वाचं असेल. विश्वचषकात या दोघांच्या खेळण्याबद्दल विचारले असता गंभीर म्हणाला, प्रथम, तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की एकदिवसीय विश्वचषक दोन वर्षांनी दूर आहे. वर्तमानात राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तरुण मुलांनी त्यांना मिळत असलेल्या संधींचा फायदा घेणं अत्यंत महत्त्वाचे आहं असं गंभीर म्हणाला.
