मोठी बातमी, स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न मोडलं, स्मृतीने केला धक्कादायक खुलासा
Smriti Mandhana : भारतीय क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न मोडलं असल्याची माहिती
Smriti Mandhana : भारतीय क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न मोडलं असल्याची माहिती स्मृतीने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधान आले होते मात्र आता स्मृतीने स्वतः लग्न मोडलं असल्याची माहिती दिली आहे. मात्र लग्न का मोडलं याबाबत कोणाताही खुलासा तिने या स्टोरीमध्ये केलेलं नाही तसेच तिने या कठीण काळात दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.
Smriti Mandhana’s Instagram story. pic.twitter.com/dBB0LZCTlp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 7, 2025
स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच अंदाज लावले जात आहेत आणि मला वाटते की यावेळी मी बोलणे महत्वाचे आहे. मी एक अतिशय खाजगी व्यक्ती आहे आणि मी ते असेच ठेवू इच्छिते, परंतु मला हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की लग्न रद्द करण्यात आले आहे. मी हे प्रकरण (Palash Muchhal) इथेच थांबवू इच्छिते आणि तुम्हा सर्वांनाही असेच करण्याचे आवाहन करते. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही सध्या दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला आमच्या गतीने पुढे जाण्यासाठी जागा द्या.
मला वाटते की आपण सर्वजण एका उच्च उद्देशाने प्रेरित आहोत आणि माझ्यासाठी, ते नेहमीच सर्वोच्च स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे आहे. मला आशा आहे की मी शक्य तितक्या काळ भारतासाठी खेळत राहीन आणि ट्रॉफी जिंकत राहीन आणि ते नेहमीच माझे लक्ष असेल. तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. पुढे जाण्याची वेळ आली आहे.
Seema Haidar Pregnant : सीमा हैदर पुन्हा चर्चेत, सहाव्यांदा होणार आई; चाहत्यांना दिली गुड न्यूज!
