Health Tips : व्यायाम करूनही चरबी घटत नाही? तर जाणून घ्या उपाय
Weight Loss Tips : आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे वजन वाढणे आदी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. मात्र हे धोकादायक आहे. कारण वाढते वजन म्हणजे समस्यांना निमंत्रण देणे होय. वाढत्या वजनांमुळे अनेक गंभीर समस्यां निर्माण होऊ शकतात. यामुळे याला वेळीच आवर घालणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. यासाठी व्यायाम करणे तसेच योग्य तो आहार घेणे हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. दरम्यान अनेकदा असेही होते की तुम्ही व्यायाम करूनही वजन कमी न होणं तसेच चरबी न घटणे अशा समस्या निर्माण होतात. मात्र याला घाबरून जाऊ नका. आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्याच्या साहाय्याने तुम्ही सहजरित्या वजन कमी करू शकतात.
वाढते वजन म्हणजे समस्यांना निमंत्रण
आजकाल वाढलेले वजन समस्या निर्माण करू शकतात. वाढत्या वजनाने कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल वेसल यासह अनेक रोग होऊ शकतात.
योग्य आहार : वजन कमी करण्यासाठी व चरबी घटवण्यासाठी सर्वात महत्वाचा प्रभावी उपाय म्हणजे तुम्ही जास्त तेलकट पदार्थ खाण्याचे टाळावे. तेलकट पदार्थ खाण्याची सवय भारतीयांमध्ये सर्वाधिक असल्याचे दिसून येते, जी वजन वाढण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करू शकता, जसे की हिरव्या भाज्या, ताजी फळे इ.
ड्रायफ्रुट्स : ड्रायफ्रुट्सचे अनेक फायदे असतात हे तर तुम्हाला माहितच असेल. स्नॅक्स म्हणून ड्रायफ्रुट्स आणि नट्सचे सेवन करा कारण त्यात हेल्दी फॅट, प्रोटीन, फायबर आणि अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, ते पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यास मदत करते.
नाश्ता महत्वाचा : अनेकजण सकाळी नाश्ता केल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळतात. मात्र सकाळचा नाश्ता देखील तितकाच महत्वाचा आहे. तुम्ही न्याहारीमध्ये ओट्स खाण्याचा प्रयत्न करा कारण ते वजन कमी करण्यास मदत करते, तसेच ते टाइप-2 मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करते.
पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता? वाचा अजितदादा काय म्हणाले
तुमच्या रोजच्या आहारात बेरीचा समावेश करा, कारण ते फायबरचा समृद्ध स्रोत मानले जाते, ते खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, त्यामुळे भूक लागण्यास वेळ लागतो. हेच कारण आहे की वजन कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.