पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता? वाचा अजितदादा काय म्हणाले

पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता? वाचा अजितदादा काय म्हणाले

NCP leader Ajit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकीवर भाष्य केले आहे. यावेळी ते पुणे माध्यमांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले की,  मी इथं एका कृतज्ञता सोहळ्यासाठी आलो होतो. मला दोन-तीन गोष्टी स्पष्ट करायच्या आहे. अलीकडे सोशल मीडियावर काहींना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही पक्षांना व नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. न्यूज 18 लोकमतने संभाजीनगरला औरंगाबादच म्हणणार असे शरद पवार म्हणाल्याची चुकीची बातमी दिली.

यामुळे समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. दिलगिरी व्यक्त करायच्या आधी तुम्ही ती बातमी योग्य आहे की नाही याची शहानिशा करा, असे  त्यांनी वृत्त वाहिन्यांना सुनावले. यावेळी त्यांनी शरद पवारांना आलेल्या धमकीवर देखील भाष्य केले.  तुमचाही दाभोळकर होणार अशी पवार साहेबांना धमकी दिली असून सौरभ पिंपळकर याने ट्विट जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Devendra Fadnavis : धमक्या देण्याचे प्रकार खपवून घेणार नाही; फडणवीसांचा इशारा

त्याच्या ट्विटरच्या बायोमध्ये भाजप कार्यकर्ता असा उल्लेख आहे. तो खरंच भाजपचा कार्यकर्ता आहे का ते माहित नाही.  विचारांची लढाई विचारांनी करुया. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर कशाला करताय. राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष दिले पाहिजे. यामागचा मास्टरमाइंड कोण आहे. त्याचा मोबाईल फोन काढून त्याचा कुणाशी संपर्क आला ते पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला पण ते 2 दिवस उपलब्ध नाहीत. यानंतर मी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले.

मोठी बातमी! ‘तुमचाही दाभोलकर होणार’; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

तसेच एखाद्या नेत्याची जनमाणसातील प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिस खात्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यावर कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी निलेश राणेंच्या ट्विटवर देखील भाष्य केले.  इतंक गलिच्छ पद्धतीने बोलण्याचे काम काही जण करत आहे. त्यांनाच बोलता येत असं नाही. तुम्ही मतभेद दाखवा पण असं बोलू नका. कोणत्याही पक्षाच्या लोकांनी असं बोलू नये. कुठल्याच पक्षाच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याचे काम नाही. याबाबत सरकार म्हणून त्यांनी कडक कायदा करायचा असेल तर कायदा करावा, किंवा अध्यादेश काढावा.  त्यानंतर कायदा करण्यात येईल, असे ते त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube