Lalbaugcha Raja Visarjan 2025 : समुद्रात मोठी भरती, लालबागच्या राजाचे विसर्जन रखडले

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : समुद्रात मोठी भरती आल्याने आतापर्यंत लालबागच्या राजाचे विसर्जन झालेले नाही. शनिवारी 6 सप्टेंबर रोजी विसर्जनासाठी सकाळी दहाच्या सुमारास मुंबईची शान म्हणून ओळखला जाणारा लालबागचा राजा विसर्जनसाठी निघाला होता मात्र आतापर्यंत विसर्जन झालेला नाही. आज सकाळी 7 सप्टेंबर रोजी आठच्या सुमारास गिरगाव चौपाटी येथे लालबागचा राजा दाखल झाला होता.
आज सकाळी आठच्या सुमारास गिरगाव चौपाटी (Girgaum Chowpatty) येथे दाखल झाल्यानंतर लालबागचा राजाची आरती करण्यात आली यानंतर लालबागचा राजाच्या विसर्जनाची (Lalbaugcha Raja Visarjan 2025) तयारी सुरु करण्यात आली मात्र समुद्रात मोठी भरती आल्याने लालबागचा राजाचा विसर्जन आतापर्यंत रखडले आहे.
यावर्षी गिरगाव चौपाटीवर नेहमीपेक्षा उशीरा लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) दाखल झाला होता. तर दुसरीकडे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी विशेष स्वयंचलित तराफा तयार करण्यात आला होता मात्र समुद्रात आलेल्या मोठ्या भरतीमुळे हा तराफा प्रचंड हालत होता त्यामुळे या तराफावर लालगबागचा राजाची मूर्ती चढवण्यात आली नाही. यानंतर लालाबागचा राजाची मूर्तीवर असणारे दागिने काढून मूर्ती तराफावर चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र काही अडचणीमुळे मूर्ती तराफावर चढवता आली नाही.
Inspector Zende : वडिलांच्या कथांपासून ते पडद्यावर: ओम राऊतचे इन्स्पेक्टर झेंडेशी खास नाते
समुद्राची भरती ओहोटी सुरु झाल्यानंतर विसर्जन होणार
तर आता लालबागचा राजाचे विसर्जन लवकरच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. समुद्रात मोठी भरती आल्याने लालबागचा राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यास अडचण येत असल्याने यंदा लालबागचा राजाचा विसर्जन होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे समुद्राची भरती ओहोटी सुरु झाल्यानंतर विसर्जन होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Soaked Raisins Benefits : महिलांनो, दररोज खा भिजवलेले मनुके, फायदे जाणून व्हाल थक्क