लालबागचा राजाच्या चरणी चिठ्ठी; बाप्पा, माझ्या नेत्याला आमदार कर, अजय चौधरींची मोठी कोंडी?
Lalbaugcha Raja : विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) गणेशोत्सवाला (Ganesh Festival 2024) यंदा वेगळे महत्त्व आले. अनेक मंडळे हे राजकीय नेत्यांशी संबंधित आहे. त्यामुळे यंदा कार्यकर्तेही जल्लोषात आहेत. लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जात आहे. त्यासाठी राज्यभर सार्वजनिक गणेश मंडळांकडून मिरवणुका काढण्यात आल्या. पुणे, मुंबईतील मिरवणुकीला तुफान गर्दी झालीय. लालबागच्या राजाच्या (
(Lalbaugcha Raja) दर्शनासाठी गर्दी झाली होती.
Jio Down: मोठी बातमी! देशभरात रिलायन्स जिओची सेवा ठप्प
लालबाग राजाची मिरवणूक मंडपाबाहेर पडत असताना एक चिठ्ठी बाप्पाच्या चरणी ठेवण्यात आली. यात आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळावे, यासाठी प्रार्थना करण्यात आलीय. बाप्पा, माझ्या नेत्याला आमदार कर… अशी प्रार्थना लालबागचा राजाच्या चरणी करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 2024 चा शिवडी विधानसभा आमदार सुधीर (भाऊ) साळवी (Sudhir Salvi) चिठ्ठीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. ही चिठ्ठी नेमकी कोणी ठेवली याबाबत माहिती नाही. परंतु साळवी यांच्या कार्यकर्त्याने ही चिठ्ठी ठेवली असल्याचे बोलले जात आहे. परंतु या चिठ्ठीमुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहेच. परंतु वेगवेगळ्या राजकीय चर्चांणाही उधाण आले आहे.
मोठी बातमी : आतिशी होणार दिल्लीच्या नव्या CM, 11 वर्षांनंतर पुन्हा महिलेच्या हाती राजधानीची कमान
शिवडी मतदारसंघात अजय चौधरी हे आमदार आहेत. ते ठाकरे गटाशी एकनिष्ठ आहे. शिवसेना फुटीनंतर ते एकनाथ शिंदेंबरोबर गेले नव्हते. परंतु आता सुधीर साळवी हे या मतदारसंघातून इच्छुक असल्याने अजय चौधरी यांची कोंडी झाली आहे. त्यात सुधीर साळवी यांनी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी दर्शनासाठी बोलविले होते.
कोण आहेत सुधीर साळवी?
साळवी कुटुंब हे ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. सुधीर साळवी यांचे वडिल सीताराम साळवी हे जुने शिवसैनिक आहेत. सुधीर साळवी हे राजकारणात सक्रीय असून, उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदारी दिल्या आहेत. साळवी हे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे संघटक आहेत. लोकसभेला दक्षिण मुंबई मतदारसंघाची समन्वयकाची जबाबदारी साळवी यांच्यावर आहे. तर साळवी हे लालबाग राजा सार्वजनिक गणेश मंडळाचे सचिव आहेत.