लालबागच्या राजाची शानच न्यारी..! अंबांनींकडून वीस किलो सोन्याचा मुकूट अर्पण

लालबागच्या राजाची शानच न्यारी..! अंबांनींकडून वीस किलो सोन्याचा मुकूट अर्पण

Lalbaugha Raja Anant Ambani : लाडक्या बाप्पाच्या स्वागताचे वेध महाराष्ट्राला लागले (Ganesh Festival) आहेत. उद्या शनिवारी गणरायाचं मोठ्या उत्साहात घराघरात आगमन होईल. त्याच्याच आगमनाची तयारी प्रत्येक जण करतोय. सार्वजनिक मंडळेही गणेशाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. मुंबईतील लालबागच्या राजाची (Lalbaughcha Raja) सध्या विशेष चर्चा होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र अनिल अंबानीने (Anil Ambani) सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. हा मुकूट तब्बल 20 किलो सोन्याचा आहे आणि त्याची किंमत 16 कोटी रुपये आहे.

Ganeshotav 2024 साठी लालबागचा राजा सज्ज; पाऊल पूजनाह मूर्ती घडविण्यास सुरवात पाहा फोटो 

अनंत अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशनने हा मुकूट बाप्पा चरणी अर्पण केला आहे. मागील पंधरा वर्षांपासून अनंत अंबानी लालबागचा राजा समितीच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. लालबागचा राजा मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळ आहे. राज्यातून तसेच अन्य राज्यांतूनही भक्त येथे दर्शनासाठी येत असतात. यंदा लालबागचा राजा मयूरासनावर विराजमान आहे. राजाची एक झलक पाहताच उपस्थितांनी मोठा जल्लोष केला. गणपती बाप्पा मोरया.. लालबागचा राजा मोरया.. अशा जयघोष येथे जमलेल्या भाविक भक्तांनी केला. अनेकांनी सोशल मीडियावर बाप्पाचं दर्शन घेतलं

यंदा लालबागच्या राजाचा मुकूट सोन्याचा आहे. अनंत अंबानी यांनी हा मुकूट बाप्पाच्या चरणी अर्पण केला आहे. गणेशोत्सवा दरम्यान मंडळाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. या उपक्रमांना अनंत अंबानी आवर्जून हजेरी लावत असतात. गिरगावातील गणेश विसर्जनावेळीही ते हजर राहतात. रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून अंबानी कुटुंबियांनी लालबागचा राजा समितीला आरोग्या संबंधीच्या विविध उपक्रमांना पाठिंबा दिला आहे.

Lalbaugcha Raja : लालबागचा राजा सार्वजनिक मंडळात अनंत अंबानींची मानाच्या पदावर नियुक्ती

अनंत अंबानी प्रमुख सल्लागार

अंबानी कुटुंबही लालाबागच्या राजाच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थिती लावत असतात. यंदाच्या वर्षी याच अंबानी कुटुंबातील एका सदस्याची लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील मानाच्या पदी नियुक्ती करण्यात आलीयं. अनंत अंबानी (Anant Ambani) यांची प्रमुख सल्लागार म्हणून कार्यकारी समितीत नेमणूक केली आहे.

अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत लालबागचा मंडळाने अंबानी कुटुंबातील अनंत अंबानी यांची मानद सदस्यपदी नियुक्ती केलीयं. एक महिन्यापूर्वी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. अनंत अंबानी हे रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव आहेत. अंबानी कुटुंबाच्यावतीने लालबागचा राजा मंडळाला मोठी देणगी दिली जात असल्याची माहिती आहे. अंबानी कुटुंबातील सदस्य भक्तीभावाने गणरायाच्या चरणी लीन होण्यासाठी लालबागमध्ये हजेरी लावतात. या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती मंडळाकडून करण्यात आल्याची चर्चा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube