लालबागच्या राजाचा दरबाराची उंची यंदा ५० फुटापर्यंत वाढवली; सुवर्ण गजानन महल साकारला

लालबागच्या राजाचा दरबाराची उंची यंदा ५० फुटापर्यंत वाढवली; सुवर्ण गजानन महल साकारला

Lalbaugcha Raja : मुंबईत गणेशोत्सवाची सुरवात होते ती लालबागच्या राजाच्या दर्शनाने. (Lalbaugcha Raja) गणेशोत्सवच्या पूर्व लालबागच्या राजाचं पारंपारक फोटो सेशन करण्यात येतं. गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दर्शनाला २४ तास अफाट गर्दी असते. त्यामुळे मिडीया प्रतिनीधींना फोटो शूट करण्यासाठी आज स्पेशल फोटो शूट मंडळाकडून नियोजीत करण्यात आले. यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरूपती बालाजीच्या राज मुकुटात बसवण्यात आला आहे, त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे.

लालबाच्या राजाची वात्सल्य मूर्ती सुवर्ण अलंकरांनी सजवण्यात आली आहे. लालबागच्या राजाची सुवर्ण पाऊलं ते सुवर्ण राज मुकुट असा राजेशाही थाट आपल्याला लालबागच्या राजाचा पहायला मिळतोय. यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची ही तब्बल ५० फूट पर्यंत वाढवण्यात आली आहे. लालबागच्या राजाचं हे फोटो सेशनसाठी होणारं पहिलं दर्शन लेझर लाईट्समुळे आणखीनच विलोभनीय झालंय.

मुंबईचा लालबाग राजाचा दरबार सजला; गणेशभक्तांची लगबग, नागरिकांमध्येही उत्साह, पहा फोटो

गणेशोत्सवाच्या आधी लालबागच्या राजाचे पहिले दर्शन समोर आले आहे. लालबागच्या राजाचा यंदाचा दरबार तिरुपती बालाजीच्या सुवर्ण राज मुकुटात बसवण्यात आला आहे. शहरात गणेशोत्सवाची सुरवात होते ती लालबागच्या राजाच्या दर्शनाने. गणेशोत्सवच्या पूर्वी लालबागच्या राजाचे पारंपरिक फोटो सेशन करण्यात येते. गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दर्शनाला २४ तास अफाट गर्दी असते. त्यामुळे आधीच फोटो सेशन करण्यात आले.

यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरूपती बालाजीच्या राज मुकुटात बसवण्यात आला आहे. त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे. लालबाच्या राजाची वात्सल्य मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली आहे. लालबागच्या राजाची सुवर्ण पावले ते सुवर्ण राज मुकुट असा राजेशाही थाट आपल्याला लालबागच्या राजाचा पहायला मिळत आहे. यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची ही तब्बल ५० फूट पर्यंत वाढवण्यात आली आहे. लालबागच्या राजाचे हे फोटो सेशनसाठी होणारे पहिले दर्शन लेझर लाईट्समुळे आणखीनच विलोभनीय झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube