“गणपती बाप्पा मोरया, ही शान कुणाची..” गणरायाचा जयघोष अन् डोळ्यांत पाणी; तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन

Lalbaugcha Raja Visarjan

Lalbaugcha Raja Visarjan Mumbai : मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाचं तब्बल 35 तासांनंतर विसर्जन झालं. गिरगावच्या समुद्रात बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्यासाठी काल अवघा महाराष्ट्र रस्त्यावर होता. भाविकांनी मोठ्या भक्तिभावात आणि भरल्या डोळ्यांनी गणरायाला निरोप दिला. पुणे आणि मुंबईतील विसर्जन मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. पुण्यात तब्बल 31 तासांनंतर विसर्जन मिरवणूक संपन्न झाली. मुंबईतही अशीच स्थिती राहिली. लालबागच्या राजाचं विसर्जनात अनेक अडचणी आल्या. तब्बल 24 तास उलटून गेल्यानंतरही लालबागचा राजाची मूर्ती उभीच होती. समुद्राला भरती आल्याने विसर्जनात अनेक अडचणी येत होत्या. अशी स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. त्यामुळे भाविकांची घालमेल वाढली होती. मात्र अथक प्रयत्नांनंतर 33 तासांनंतर राजाचं विसर्जन पार पडलं.

22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर (Lalbaugcha Raja) पोहोचला. यानंतर राजाला तराफ्यावर घेऊन आरती होणार होती. यावेळी गणेशभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. परंतु, बरेच प्रयत्न केल्यानंतरही मूर्ती तराफ्यावर घेता आली नाही. नियोजन चुकलं होतं. त्यातच समुद्राला भरती आली होती. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे तराफा स्थिर राहत नव्हता. दोन तासांच्या प्रयत्नांनंतरही मूर्ती तराफ्यावर घेता आली नाही.

Lalbaugcha Raja : तब्बल 24 उलटले तरी बाप्पाचं विसर्जन नाही, भाविकांच्या डोळ्यांत पाणी; हेलिकॉप्टरही आणलं..

तब्बल 33 तासांनंतर बाप्पाचं विसर्जन 

पाणी ओसरल्यानंतर विसर्जन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तेव्हापासून जवळपास आठ तास मूर्ती पाच फूट पाण्यातच होती. साडेआठ तासांनंतर पाणी ओसरल्यानंतर मूर्ती तराफ्यावर चढवण्यात यश आलं. यावेळी उपस्थित भाविकांनी “गणपती बाप्पा मोरया”, “ही शान कुणाची लालबागच्या राजाची”, असा जयघोष केला. या जयघोषाने सगळा परिसर दुमदुमून गेला होता.

मूर्ती तराफ्यावर घेतल्यानंतरही काही काळ थांबावं लागलं. यानंतर रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी आरती करण्यात आली. पुढे 9 वाजून 12 मिनिटांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने खोल समुद्रात बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची तोबा गर्दी झाली होती. गणरायाच्या जयघोषात आसमंत दुमदुमून गेला होता. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. विसर्जनासाठी प्रशासनाने व्यवस्था केली होती. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त याठिकाणी होता.

Sharad Pawar: शरद पवार 30 वर्षांनंतर लालबागचा राजाच्या चरणी, जावई आणि नातीसोबत घेतलं दर्शन, पाहा फोटो

follow us
  • fb
  • instagram
  • youtube