Sharad Pawar: शरद पवार 30 वर्षांनंतर लालबागचा राजाच्या चरणी, जावई आणि नातीसोबत घेतलं दर्शन, पाहा फोटो

  • Written By: Published:
1 / 6

Sharad Pawar: शरद पवार (Sharad Pawar) आपल्या जावई आणि नातीसह आज लालबाग राजाच्या दर्शनासाठी पोहोचले. (Lalbaugcha Raja Darshan) त्यानंतर त्यांनी चिंचपोकळीच्या चिंतामणीचंही दर्शन घेतलं.

2 / 6

सगळीकडे गणेशोत्सवाची जोरदार धामधूम सुरू आहे. अशातच गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेलं लालबाग गजबजून गेलं आहे. लालबागमध्ये देश-विदेशातून भाविकांनी गर्दी केली आहे.

3 / 6

अनेक राजकीय नेतेमंडळींनीही लालबागमधील गणपती मंडळांमध्ये गणरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. लालबागमधील प्रसिद्ध मंडळांपैकी एक असलेलं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातही गणरायाच्या दर्शनासाठी अनेक दिग्गजांची मांदियाळी बघायला मिळत आहे.

4 / 6

लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी आज (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी हजेरी लावली. आपले जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासोबत शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी पोहोचले.

5 / 6

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यापूर्वी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.

6 / 6

थोरले पवार दुसऱ्यांदा लालबाग राजाच्या चरणी लीन झाले आहेत. यापूर्वी ज्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube