मोठी बातमी : आतिशी होणार दिल्लीच्या नव्या CM, 11 वर्षांनंतर पुन्हा महिलेच्या हाती राजधानीची कमान
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) यांनी पदाचा राजीनाम देण्याची घोषणा केल्यानंतर नव्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता याबाबतचा सस्पेंन्स संपला असून, केजरीवाल यांनी आतिशी (Atishi) यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे जवळपास 11 वर्षांचनंतर पुन्हा एकदा राजधानी दिल्लीची कमान संभाळण्याची जबाबदारी एका महिलेच्या हाती आली आहे. (Arvind Kejriwal Proposed Atishi Name For Next Delhi Chief Minister)
Delhi CM Arvind Kejriwal proposes the name of Delhi Minister Atishi as the new Chief Minister. She has been elected as the leader of Delhi AAP Legislative Party: AAP Sources pic.twitter.com/65VPmPpA39
— ANI (@ANI) September 17, 2024
अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी (AAP) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतीशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. याला सर्व आमदारांनी सहमती दर्शवली. याआधी आम आदमी पक्षाच्या पॉलिटिकल अफेयर्स कमेटीने दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचे नाव सुचवले होते. सोमवारी (16 सप्टेंबर) पीएसीची बैठक झाली. अरविंद केजरीवाल यांनी रविवारी (15 सप्टेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज आपच्या विधिमंडळ पत्राच्या बैठकीत केजरीवाल यांनी आतीशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला सर्व आमदारांनी एकमताने पाठिंबा दर्शवला आहे.
आज मी दुःखी, माझे अभिनंदन करू नका; दिल्लीची कमांड मिळालेल्या आतिशींची पहिली प्रतिक्रिया
अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक करण्यात आली. यानंतर केजरीवाल यांना सीबीआयने अटक केली. मात्र, सीबीआय प्रकरणात केजरीवाल यांना 13 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला. तर, ईडीच्या खटल्यात केजरीवाल यांना आधीच जामीन मिळाला होता. सीपीआयच्या खटल्यात जामीन मिळाल्यानंतर ज्यावेळी तिहार तुरूंगातून केजरीवाल बाहेर आले. त्यानंतर त्यांनी रविवारी (दि.15) आपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजीनाम्याची घोषणा केली होती.