बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची दिल्लीत हत्या, किरकोळ वादात गेला जीव; नेमकं काय घडलं?

Huma Qureshi Cousin Murder : राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या (Huma Qureshi) चुलत भावाची हत्या करण्यात आली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पार्किंगवरुन झालेल्या किरकोळ वादातून काही जणांनी हुमाच्या भावावर जीवघेणा हल्ला केला. यात असिफ कुरेशीचा (Asif Qureshi) मृत्यू झाला.
दिल्लीतील जंगपुरा भोंगल बाजार लेन भागात ही थरारक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री उशीरा स्कूटी गाडी गेटवरून हटवून साइडला लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात आरोपींनी आसिफ कुरेशीवर हल्ला केला. यात आसिफ कुरेशी गंभीर जखमी झाले. याच अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ब्रेकिंग : कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार; पुढचं टार्गेट मुंबई; बिश्नोई गँगची धमकी
आसिफ यांची पत्नी आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे की किरकोळ वादातून आरोपींनी थेट जीव घेतला. आसिफच्या पत्नीने सांगितले की पार्किंगच्या कारणावरुन माझ्या पतीचे आरोपींशी भांडण झाले. कामावरून घरी आल्यानंतर घरासमोर शेजाऱ्यांची स्कूटी पार्क करण्यात आली होती. स्कूटी येथून काढून घ्या असे त्यांना सांगितले. मात्र शेजाऱ्यांनी गाडी काढून घेण्याऐवजी आसिफ कुरेशी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेला आणि धारदार वस्तूने आसिफ यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांकडील माहितीनुसार अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची दिल्लीतील निजामुद्दीन भागात हत्या झाली आहे. पार्किंगच्या वादातून आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. हत्यारही जप्त करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. आसिफ कुरेशी यांचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्कूटी बाजूला घ्या म्हटल्याचा इतका राग आला की त्यात थेट एकाचा जीव गेला या घटनेने प्रत्येकालाच धक्का बसला आहे.
Farah Khan : फराह खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, आईच्या मायेचे छत्र हरपले