आज मी दुःखी, माझे अभिनंदन करू नका; दिल्लीची कमांड मिळालेल्या आतिशींची पहिली प्रतिक्रिया

  • Written By: Published:
आज मी दुःखी, माझे अभिनंदन करू नका; दिल्लीची कमांड मिळालेल्या आतिशींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर आतिशी यांची निवड झाल्यानंतर आता त्यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मिळालेल्या संधीबाबत त्यांचे गुरू आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे आभार मानले आहे. यावेळी आतिशी म्हणाल्या की, आज मी जितकी आनंदी आहे तितकीच दुःखी आहे. केजरीवाल यांच्या राजीनाम्यामुळे दिल्लीतील जनता खूप दु:खी असून, मुख्यमंत्री झाल्याबद्दल माझे अभिनंदन करू नका. हार घालू नका असे आतिशी यांनी म्हटले आहे. (Atishi First Reaction After being elected as a new delhi CM)

काय म्हणाल्या आतिशी?

अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणाऱ्या आतिशी म्हणाल्या की, “सर्वप्रथम मी अरविंद केजरीवाल यांचे आभार मानते ज्यांनी मला इतकी मोठी जबाबदारी दिली आहे. केजरीवाल यांनी माझ्यावर विश्वास ठेवला यासाठी माी माझे नेते आणि गुरू केजरीवाल यांचे मनापासून आभार मानले. त्या पुढे म्हणाल्या की, पहिल्यांदाच आमदाराला मुख्यमंत्री बनवले जाते हे फक्त आम आदमी पक्षामध्येच हे घडू शकते. केजरीवाल यांनी माझ्यावर विश्वास ठेवला याचा मला खूप आनंद आहे, त्यासोबतच आज अरविंद केजरीवाल राजीनामा देत आहेत याचेही मला दु:ख असल्याचे आतिशी म्हणाल्या.

LIVE : ३६ तास मिरवणूक चालली तर…;अजितदादांचे सर्वांना कळकळीचे आवाहन

भाजपवर जोरदार हल्लाबोल

भाजपवर हल्लाबोल करताना आतिशी म्हणाल्या की, “दिल्लीचे एकच मुख्यमंत्री आहे आणि ते म्हणजे अरविंद केजरीवाल. मात्र, भारतीय जनता पक्षाने एका प्रामाणिक माणसावर खोटे आरोप केले, खोट्या प्रकरणात 6 महिने तुरुंगात ठेवले, एजन्सीचा गैरवापर केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना केवळ जामीनच दिला नाही तर, केंद्राला जोरदार चापटही मारली आहे. सरकारी एजन्सी केंद्राच्या पोपट असून, केजरीवाल यांना झालेली अटक चुकीची होती आणि आहे असेही आतिशी म्हणाल्या.

Accident : पुण्यात तर्राट वाहनचालकाचा प्रताप; थेट चंद्रकांतदादांच्या गाडीलाच ठोकलं

केजरीवालांचे तोंडभरून कौतूक

भाजपवर हल्लाबोल केल्यानंतर आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांचे तोंडभरून कौतूक केले. त्या म्हणाल्या की, केजरीवालांच्या जागेवर जर दुसरा कोणी नेता असता तर, त्यांनी मुख्यमंत्रीपद कदापी सोडले नसते, परंतु इतिहासात पहिल्यांदाच पद सोडत मी जनतेच्या दरबारात जाईन, असे म्हटले आहे. केजरीवाल जर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले नाही तर, चांगले शिक्षण, मोफत वीज, मोफत प्रवास आणि रुग्णालयातील सर्व सुविधा बंद होतील हे दिल्लीच्या लोकांना माहित आहे. त्यामुळेच आपल्याला केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी निवडून आणायचे आहे असे आतिशी म्हणाल्या. आगामीकाळात होणाऱ्या निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री म्हणून मी फक्त केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणे हेच काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube