विधानसभेला नव्या समीकरणांची नांदी : बच्चू कडू-संभाजीराजे छत्रपतींची तासभर बंद दाराआड चर्चा
पुणे : मागील काही दिवसांपासून महायुतीशी फटकून वागत असलेले प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) हे एकाच व्यासपीठावर आले होते. सोमवार (8 जुलै) पुणे शहरात छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. याच शिबिराला बच्चू कडू यांनी उपस्थिती लावली होती. या शिबिरानंतर दोघांमध्ये सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याचीही माहिती आहे. (Prahar MLA Bachchu Kadu and Sambhaji Raje Chhatrapati, head of Swarajya Sangathan met)
लोकसभा निवडणुकीपासूनच बच्चू कडू आणि महायुतीचे संबंध ताणले आहेत. अमरावती मतदारसंघात आपल्याला विश्वासात न घेता भाजपने नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली, असा त्यांचा दावा होता. तेव्हापासून ते शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांसोबत जाहीरपणे फटकून वागत आहेत. लोकसभेलाही त्यांनी प्रहार पक्षाचा उमेदवार दिला. त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांना झाला.
वरळी हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट! अखेर मुख्य आरोपी मिहीर शाहसह 12 जणांना अटक
आताही त्यांनी स्वराज्य संघटनेच्या व्यासपीठावर हजेरी लावत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. इतकेच नाही तर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दोन्ही बाजूने स्वराज्य आणि प्रहार पक्षाच्या युतीबाबत जाहीर चर्चा झाली. या नंतर संभाजीराजे आणि आमदार बच्चू कडू यांच्या तासभराची बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीबाबत बोलताना बच्चू कडू यांनी, शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सरकारची भूमिका पाहून आम्ही पुढचा निर्णय घेऊ, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु असे सांगितले आहे.
वसंत मोरेंच्या हाती शिवबंधन; बडा नेता हाताशी येताच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना घेरले
संभाजीराजे काँग्रेसपासून लांब राहणार?
संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी स्वराज्य संघटनेची स्थापना केली होती. याच संघटनेच्या माध्यमातून त्यांनी लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याची तयारीही केली होती. मात्र अचानक महाविकास आघाडीकडून काँग्रेसने संभाजीराजे छत्रपती यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांनी महाराजांच्या प्रचारात लक्ष घातले. आता निवडणूक झाल्यानंत संभाजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सध्याच्या कार्यक्रमावरुन स्पष्ट होते.