खासगी वाहनावर लाल-निळा दिवा; तोतया आयपीएस अधिकारी बनून व्यावसायकाला घाता 1 कोटीचा गंडा
कडे यांनी मिश्रा याच्या विश्वासाने भारावून जाऊन त्याला एकूण 1 कोटी 7 लाख 88 हजार 106 रुपये इतकी रक्कम दिली. यामध्ये रेल्वे डेपो येथे

Nashik Fake IPS Crime : नाशिकमध्ये तोतया आयपीएस अधिकारी बनून एका व्यावसायकाची १ कोटीहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. येथील अंबड पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आरोपीने बनावट ओळखपत्रं दाखवून रेल्वेचं बनावट टेंडर मिळवून देण्याचं आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचं समोर आले आहे. इतकंच नव्हे तर आरोपीने पीडित व्यावसायिकांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अंबड पोलिसांनी अटक केली आहे.
लाल-निळ्या दिव्यांची गाडी
विठ्ठल सखाराम वाकडे (56, व्यवसाय ट्रान्स्पोर्ट, रा. श्रीजी बंगला क्र. 57, पाणिनी सोसायटीच्या मागे, वसंतनगर, राणेनगर) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, आरोपी गौरव अच्छेराम मिश्रा (37, रा. मिश्रा हाऊस, महालक्ष्मीनगर, कामटवाडे, अंबड लिंक रोड, नाशिक) याने 2018 मध्ये त्यांच्याशी ओळख करून घेतली. आरोपी मिश्रा हा स्वतःला भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असल्याचं भासवत होता. तो नेहमी पोलीस गणवेश परिधान करून लाल-निळ्या दिव्यांची गाडीतून फिरत असे. त्याने आपल्याकडे शासनाने दिलेले सुरक्षा रक्षक असल्याचं दाखवून वाकडे यांचा विश्वास संपादन केला. मिश्रा याने वाकडे यांना रेल्वेचे बनावट टेंडर मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळल्याचंही समोर आलं आहे.
Video : वांद्रे टर्मिनसवरील जीवघेणी चेंगराचेंगरीची घटना; पाहा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ
वाकडे यांनी मिश्रा याच्या विश्वासाने भारावून जाऊन त्याला एकूण 1 कोटी 7 लाख 88 हजार 106 रुपये इतकी रक्कम दिली. यामध्ये रेल्वे डेपो येथे गाड्यांचा पुरवठा, सिक्युरिटी डिपॉझिट, गाड्यांचा खर्च अशा विविध कारणांसाठी पैसे देण्यात आले. मात्र, कालांतराने वाकडे यांना मिश्राच्या बनावटीची जाणीव झाली. त्यांनी मित्राकडे पैसे परत करण्याची मागणी केली असता तो त्यांना टाळाटाळ करू लागला. दि. 13 ऑक्टोबर 2024 रोजी मिश्राने वाकडे यांना आगरा हॉटेल, पाथर्डी फाटा, नाशिक येथे भेटण्यासाठी बोलावलं, तेथे 10-12 गुंडांना सोबत घेऊन आलेल्या मित्राने वाकडे यांना रिवॉल्व्हरचा धाक दाखवून धमकी दिली.
गुन्हा दाखल
त्याने आपण पैसे विसरून जा असं वाकडे यांना सांगितलं. तसंच त्यांच्याकडून दरमहा 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली. वाकडे यांना माहिती झालं की, इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये मिश्रा याच्याविरुद्ध बनावटपणाचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत मिश्रा याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी मिश्रा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अंबड पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.